मुख्य सामग्रीवर वगळा

बंधन ..! (कथा भाग १)

"आज कित्येक वर्ष निघून गेली !! पण ते बंधन आजही तसच का आहे?? हेच मला कळले नाही !! या पलंगावर पडून कित्येक दिवस असेच गेले !! त्या फिरणाऱ्या गोल चाकांचा काय तो आधार मला !!! पण एवढं सगळं असूनही पुन्हा आजारपणाची भर !! कदाचित त्या देवालाही मला स्वतः कडे बोलावण्याची घाईच झाली आहे !!!" विशाल मनातलं लिहीत होता.
" प्रितीला भेटून कित्येक वर्ष लोटून गेली !! उरल्या शेवटच्या आठवणीत आजही दिवस सरतात !! तिच्या मागच्या वर्षी लिहिलेल्या ' मनाची काहूर !' या पुस्तकाची पाने वाचून मन भरून येत !! ती मला आजही विसरली नाही, याचंच कौतुक वाटत !! तिच्या आजपर्यंतच्या प्रत्येक लिखाणाचं कौतुक केलं मी !! आवर्जून पत्र लिहिली !! पण वेगळ्या नावाने !!! " विशाल लिहिता लिहिता थांबला.
एक अश्रू त्या वहीच्या पानावर पडला आणि कदाचित लिहिण्याच थांबवावं अस विशालला सांगून गेला.
"मारिया !! " जोरात विशाल ओरडत होता.
"मारिया !! " त्या एवढ्या मोठ्या घरात त्याचा आवाज घुमत होता.
लांबून कोणीतरी पळत येतं आहे याचा आवाज झाला. मारिया विशालच्या खोलीत आली आणि बोलु लागली.
"काय पाहिजे विशाल ?" पन्नास साठ वर्षाची ती मारिया एकटक विशालकडे पाहत होती.
"मला बाहेर घेऊन चल !! " विशाल डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होता.
"विशाल बेटा , आज पुन्हा प्रितीची आठवण झाली ?" मारिया विशालची नोकर, पण अगदी विशालच्या जवळची होती. कित्येक वर्ष  विशालकडे काम करत होती. अगदी विशालच्या आईसारखी होती.
"नाही मारिया !!अस काही नाहीये !!"
"विशाल बेटा !! किती वर्ष झाली ओळखते मी तुला !! मनातलं असंच मनात ठेवायची सवयच आहे तुला!! " मारिया विशालला एका बाजूने उचलत खुर्चीवर बसवत होती. विशालही तिला आता मनातलं सांगु लागला.
"आज मी पुन्हा प्रितीला पत्र लिहिलं मारिया !! आणि त्यात तिला म्हटलं की कदाचित हे माझं तुला शेवटचं पत्र असेल !! पण अखेर पर्यंत तुझे शब्द माझ्या सोबत राहतील !! " विशाल त्या व्हीलचेअर वर बसून बाहेरच्या मोकळ्या जागेत आला. मारिया शेजारीच बसून होती.
"कसं असतं बघ ना मारिया !! ती प्रिती आजही माझ्यावर किती प्रेम करते !! पण मला तिच्याकडे जायला या बंधनातून कधीच सुटका मिळत नाही !! आणि मला माझ्या या परिस्थितीची जाणीवही तिला कधीच करून द्यायची नाही !! "  विशाल समोरच्या बुडत्या सूर्याकडे पाहत म्हणाला.
"पण का ?" मारिया अगदिक होऊन बोलु लागली.
"कारण आपण काही वाईट स्वप्ने कधी पहिलीच नाहीत असं म्हणायचं आणि पुढे जायचं !! मारिया, तिच्या मनात आजही माझ्याबद्दल प्रेम आहे !! मी तिच्यापासून दूर गेलो यात काहीतरी कारण नक्की असणार हे तिलाही माहीत आहे !! पण ते कारण कळू नये असंच मला वाटतं !!" विशाल व्हीलचेअरकडे पाहत म्हणाला.
"पण मला माझ मन सांगत !! ती तुला नक्की शोधत येणार !! " मारिया विशालच्या मागे उभा राहत म्हणाली.
"ती वेळ कधीच येऊ नये असं मला वाटतं !! " विशाल आणि मारिया कित्येक वेळ तिथेच थांबले.
  विशालच्या अपंगत्वाचा तेवढा एकच आधार होता. मारिया !! त्याच्या आयुष्यात बाकी काहीच राहिले नव्हते !! उरल्या होत्या काही आठवणी आपल्याच लोकांच्या!! पण त्याही काहीच दिवस!!
विशाल पुन्हा त्या पलंगावर पडून राहिला. मारिया त्याला तिथे झोपवुन निघुन गेली.
"श्वास कदाचित आता मोजत असतील, शेवटचेच आपले क्षण !! पण मी त्यांना सांगणार आहे !! दोन क्षण थांबा, मला माझ्या प्रितीचा चेहरा शेवटचा एकदा माझ्या नजरेत आणु द्या !! अगदी अखेरचा !! ही विनवणी तुम्हाला !! " विशाल पलंगावर पडून होता. मनात कित्येक विचार होते.
"माझं शरीर जरी पंगू झालं असलं तरी माझ मन प्रितीला रोज भेटत !! कित्येक वेळ ते चालत चालत जात दूर त्या डोंगरात तिच्या सवे !! पाहत बसत मावळती!! आणि तिच्या नजरेतील मी !!मग हळूच घेत तिच्या गालांच चुंबन आणि धावत माझ्याकडे येत !! मन खूपच तिच्यावर प्रेम करत !! " रात्रीच्या त्या एकांताचा वेळी विशाल आपल्या मनाशीच कित्येक वेळ बोलत होता.
ते घड्याळ मात्र सारखं टिक टिक करत होत. विशालला आपल्या स्वतःची जाणीव करून देत होत. ती रात्र  तिच्या आठवणीत किती सुंदर वाटते ना. असे विचारत होत!
"पण प्रिती तुझी साथ आजही आहे !! तुझ्या शब्दांची !!या रात्रीच्या शांततेस भंग करायला तुझ्या कवितेच्या त्या ओळी मला साथ देतात!!

"मज पाहिजे सख्या तुझीच साथ
या आठवांचा मज होतो जाच
नकोस देऊ तू दुरावा मज आता
तोडून बंधने, घे मला कवेत

सांग त्या अंधारास तू काही
नकोस करू क्षणाची घाई
ठेव काही क्षणांस जपून तू
मज आहे तुझ्या भेटीची आस

हो! तू आहेस प्रत्येक श्वासात
माझ्या मनातल्या प्रत्येक घरात
त्या श्वासास ओळख तुझी होताच
उरलास फक्त तू या हृदयात!!! "

अखेर उरलो फक्त मी या एकांतात !!! " विशालचा आवाज साऱ्या घरात घुमला !!

क्रमशः ...

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...