पाठीवरती हात फिरवता
खंजीर त्याने मारला होता
तोच आपुलकीचा सोबती
ज्याने घाव मनावर दिला होता
अश्रू पुसण्यासाठी हात येताच
कित्येक वेळ आपुला वाटला होता
त्याच अश्रूंचे कित्येक उपहास तो
चारचौघात करत बसला होता
सोबती चालण्यास मला तो
वाट त्याची दाखवत होता
चार पाऊले चालता चालता
पाय अडकवून पाडत होता
मनाच्या तळाशी विश्वास होऊन
तोच का दिसत होता
डोळे झाकून आपुला म्हणातना
तोच परका झाला होता
मी आणि माझ्यातील मी
तोच चांगला ओळखत होता
कित्येक नवीन चेहऱ्यात आता तो
मला अनोळखी आज झाला होता
भेटला एक आपुलकीचा तो
जो खरंच माझा झाला होता
चुकतात लोक माणसं ओळखायला
शेवटी मात्र सांगायचं राहिला होता
✍योगेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply