सहवास!! (कथा भाग ३)

सुमेधा रात्रभर सायली जवळ बसून होती. तिथेच ती झोपी गेली होती. सकाळी दरवाजाची कडी वाजल्याचां आवाज झाला आणि तिला जाग आली. सकाळी सकाळी सुमेधाची सासू तिला भेटायला आली होती. दरवाजा उघडत सुमेधा म्हणाली.
"सासूबाई तुम्ही सकाळी सकाळी ??"
"गावाकडे मनच लागेना!! तुला भेटावसं वाटलं म्हणून आले परत !! " सुमेधाची सासू  घरात येत म्हणाली.
"बरं झालं तुम्ही आलात !! " सुमेधा आत जात म्हणाली.
कित्येक वेळ ती घरातलं सगळ आवरत होती. एक चहाचा कप ती सासुबाईकडे देत म्हणाली.
"गावाकडे कसे आहेत सगळे !! "
"मजेत आहेत !! रमण बद्दल कळालं म्हणून विचारपूस करत होते!! "
सुमेधा हातातल्या चहाचा घोट घेत फक्त पाहात होती.
"इतकं चागलं पोर माझं !! त्या दारू पायी गेलं !! की मारलं कोणास ठाऊक!! " सासू पदराने डोळे पुसत म्हणाल्या.
"म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला ??"सुमेधा अचानक बोलून गेली.
"जिवंतपणी मारलं माझ्या पोराला तू !! त्याची बायको झालीस !! पण फक्त शरीराने!! "
"काय बोलताय तुम्ही सासूबाई ??" सुमेधा हातातला चहाचा कप खाली ठेवत म्हणाली. तिला हे सगळं अनपेक्षित होत.
"२५ वर्षांपूर्वी झाल त्याची शिक्षा तू त्याला प्रत्येक क्षणाला दिलीस !! मारलस माझ्या पोराला !! "
"सासूबाई मी कशाला मारू त्यांला !!बायको म्हणून सारी कर्तव्य पार पाडलीचना मी !! " सुमेधाला खूप काही बोलायचं होत पण ती शांत झाली.
"फक्त कर्तव्यच केलीस तू !! " सासूबाई तिरस्काराने सुमेधाकडे पाहत म्हणाल्या.
त्या दोघींच्या आवाजाने सायलीला जाग आली. ती लगबगीने बाहेर आली. आजीला समोर पाहून ती आई जवळ जाऊन उभी राहिली.
"माझच चुकलं !! तुझ्यासारख्या रांडेच्या पदरात माझ पोर टाकलं!! आणि मारल मी !! क्षणाक्षणाला !! २५ वर्ष !! "
"सासूबाई !! तोंडाला येईल ते काय बोलताय!! " एव्हाना आता सुमेधाचा ही पारा चढला होता.
आईचं हे रूप पाहून सायली थोडी घाबरली होती.
"नाही माझच चुकलं!! चुकलचं माझं !! " अस म्हणत सुमेधाची सासू तडक बाहेर निघून गेली.
सायली आजीच्या मागे जाणार तोच.
"सायली !! कुठेही जाऊ नकोस !! जाऊ दे त्यांना !! " सुमेधा राग शांत करत बोलली.
सायली काहीच न बोलता आत निघून गेली. सुमेधाने घराचं दार बंद करून घेतलं.
"तुम्हाला झाकायला जागा आहे म्हणून तुम्ही पुरुष !! माझ्या आयुष्याची लाज काढली तरी तुमचंच पुरुषपण जपत राहायचं आम्ही !! कशासाठी रे !! फक्त लाज राखायला!! करा हवा तेवढा छळ करा !! वाटेल तेव्हा अंगा खाली घ्या !! आणि पुन्हा आमच्याच लाजेचे लखतर आमच्याच मढ्यावर ओढून मोकळे व्हा!! २५ वर्ष या माणसाने दुसर केलं तरी काय!!" सुमेधा डोळ्यातून ओघळत्या अश्रूनसोबत त्या तिच्याच नशिबाशी बोलत होती.
"एक बायको म्हणून मी त्यांची राहिलेच ना !! परपुरूषाचा स्पर्शही या देहाला कधी माहीत नाही !! आज मला कळतेय की काल एवढी लगबग का होती माझी!! मनोजला भेटायची !! कारण त्याने माझ्यावर प्रेम केलं !! मनसोक्त प्रेम केलं!! फक्त प्रेम केलं !! कोणतीही अपेक्षा न ठेवता !! " सुमेधा डोळ्यातले अश्रु पुसत उठू लागली.
सायली स्वयंपाक घरात आवरत होती. सुमेधा तिथे येताच ती एकदम सावरली.
"आई !! आजी एवढी का चिडली होती !! "
"काही नाही ग !! असच !! " सुमेधा सायलीकडे पाहतही नव्हती.
"आई !! मला एवढं तरी कळतं की नक्की काय झालंय ते !!! आजी जे काही म्हणत होती ते !! "
"बाळा !! आयुष्यात कितीही श्रीमंत झालात तरी प्रेम नाही विकत घेता येत !! त्यासाठी समोरच्याला जीव लावावा लागतो !!"
सायली सुमेधाकडे पाहत म्हणाली.
"म्हणजे तुझ बाबांवर प्रेम नव्हतं ??"
"एक पत्नी म्हणून मी सारी कर्तव्य केली !! पण एक स्त्री म्हणून कधीच नाही !! मी फक्त त्यांची पत्नी होते !! "
"म्हणजे तुझ बाबा वर प्रेम नव्हतं तर!! "
सुमेधा काहीच न बोलता गप्प राहिली.
पण सायली मनातून पुरती गोंधळली.  तिच्यासाठी हे आईचं नवीनच रूप होत. आईच्या मनात बाबा बद्दल प्रेमचं नाही हे ऐकुन ती अबोल झाली.
सुमेधा मात्र या सगळ्या गोष्टीतून आता सावरण्याचा प्रयत्न करत होती.
"माझ्याही अश्या असण्याला काही कारणे आहेत बाळं !! एक स्त्री मनातून खूप कठोर असते !! कारण तिने स्त्रित्वाचे कित्येक घाव सोसलेले असतात!! अंतरीच्या या पटलावर कित्येक गोष्टी आहेत ज्या तुला मी वेळ आल्यावर नक्की सांगेन !! बाळ तुझ्या आईला वाईट समजू नकोस !! " सुमेधा आपल्या मना सोबतच व्दंव्द करत होती.
सायली मात्र आता सुमेधाला जास्त बोलत नव्हती. मोजकेच पण तुटक बोलत होती.
"बाळ सायली !! तुझे ते शिक्षक आहेत ना मनोज देसाई ते उद्या आपल्या घरी येणार आहेत !! " सुमेधा सायलीकडे बघत म्हणाली !
"ठीक आहे !! " सायली खाली मान घालून काहीतरी लिहिण्यात व्यस्त होती.
"विचारलं नाहीस का ते ??"
"का ??" सायली वर सूमेधाकडे पहात म्हणाली.
"ते माझे जुने मित्र आहेत !! परवा तुला सोडायला आले होते तेव्हा भेट झाली माझी !! "
"बरं !! "
"सायली काय झालंय तुला !! माझ्याशी नीट बोलत नाहीस !! तुटक तुटक वागतेस !! काय झालं आहे तुला ??"
"कुठ काय?? काही नाही !!!
"तुला याचाच राग आलाय ना की मी तुझ्या बाबांवर प्रेम का केलं नाही ते !!  बाळा प्रेम मनातून होत !! आणि जे मन, दुसऱ्याच प्रेम प्रेमाने जिंकत ना !! त्याला प्रेम म्हणतात !! यापुढे मी काही बोलू शकत नाही !! तुझे बाबा आहेत ते!! तू नक्कीच त्याच्यावर प्रेम कर आणि करत राहा !! मला त्याविषयी काहीच बोलायचा हक्क नाही!!" सुमेधा अगदी मनापासून बोलत होती. डोळ्यातले अश्रू पुसत होती.
ती काहीच न बोलता खोलीत निघून गेली. सायली कित्येक वेळ बाहेरच बसून होती. आपण आईशी अस वागायला नव्हतं पाहिजे अस मनातून तिला वाटत होत.
सुमेधा कित्येक वेळ खोलीतल्या त्या जळत्या दीव्याकडे पहात होती .

अखंड जळत राहिले मी
माझेच मला विसरून
अखेरच्या क्षणी उरले
ते कलकांचे काजळ जगी

क्रमशः..

✍योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...