मुख्य सामग्रीवर वगळा

सहवास ..!! (कथा भाग २)

"आज अचानक मनोज भेटला आणि मनाला थोड बर वाटल! किती वर्षाने भेटला मला तो. पहिले तर वाटत होते कधी समोर आलेच त्याच्या तर बोलणारच नाही मला !!पण बोलला मला ! असंख्य विचार क्षणासाठी येऊन गेले!! २५ वर्षांपूर्वी रागावून गेला होता माझ्यावर!! रमणशी लग्न करते हे कळाल्यावर पुन्हा कधी भेटलाही नाही मला तो!! की विचारायला आला नाही कधी मला!! की ज्या व्यक्तीचा, ज्याच्या कृत्यांचा नेहमी मी तिरस्कार करत आले त्याच्याशी मी का लग्न केले!! पण काही असो सगळं विसरून तो कधी काही घडलच नाही अश्या भावात मला सामोरा आला." सुमेधा दिवसभर कित्येक विचार करत होती.
घड्याळातल्या काट्यानकडे सतत बघत होती. आणि संध्याकाळ होताच मनोजच्या आधी आपण तिथे पोहचायच हे मनाशी ठरवत होती.
"खरतर त्याच रागावणं योग्यच होत!! चुकले ती मीच !! पण खरंच मी चुकले का ??  मलाच कधी कळतं नाही हे !!  ज्या व्यक्तीला मला बोलायचही नव्हतं कधी!! त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवल मी !! पुरती २५ वर्ष म्हणजे तारुण्याचा सगळा काळ !! ज्या काळात आपल्या हव्याहव्याशा व्यक्तीसोबत आयुष्याची , तारुण्याची मजा घ्यायची तो काळ मी त्याच्यासोबत घालवला !! रमण सोबत !! " अनेक विचारात गुंग असलेली सुमेधा अचानक घड्याळाकडे पाहू लागली. एव्हाना घड्याळात ६ वाजून गेले होते.
सुमेधा लगबगीने उठली. आज जरा घाईतच ती ऑफिस मधून बाहेर पडली. गाडीच्या वेगासोबत तिच्या मनातल्या विचारांचं वेग जरा जास्तच होता.
"घाई आणि गडबड कशासाठी?? २५ वर्षे ज्या व्यक्तीला माझी साधी आठवणही आली नाही त्याच्यासाठी!! की मनात आजही ती सल आहे त्यासाठी?? माहीत नाही पण ही ओढ कदाचित पुन्हा त्याला पाहण्यासाठी असेनही!! " सुमेधा त्या जुन्या कट्ट्या जवळ पोहचली. मनोज आजही तिच्या आधी तिथे येऊन तिची वाट पाहत बसला होता.सुमेधा त्याच्या जवळ येत म्हणाली.
"थोडा उशीरच झाला मला !! ऑफिसच्या कामात वेळ कसा गेला कळलंच नाही !! "
"ठीक आहे ग !! बस आता !! "
"आज अचानक भेटलास आणि मला खरंच काय बोलावं ते कळलंच नाही!! " सुमेधा मनोजकडे पहात होती. डोळ्यात आज तिच्या एक वेगळीच चमक होती.
"होका !! पण मला तू भेटशील हे कधी वाटलेच नव्हतं !! तुझी मुलगी ??""
"सायली!! सायली नाव आहे तिचं !! "
"सायली ज्या कॉलेज मध्ये शिकते तिथेच मी प्राध्यापक आहे !! " मनोज सुमेधा कडे एकटक पाहत होता. सुमेधा मात्र आता नजर चोरत होती.
"खरंच !!" सुमेधा आश्चर्य वाटतं म्हणाली.
"हो !! किती वर्षाने भेटतोय ना आपण !! मला तर वाटलंच नव्हतं तू कधी मला अशी भेटशील म्हणून !! " मनोज शेजारच्या फुलांकडे पहात म्हणाला.
"मलाही कधी भेटशील अस वाटल नव्हत !! त्यावेळी मला काहीच न बोलता गेलास आणि मनात राग धरून बसलास !! तुझ्या आजच्या या वागण्याने खरंच मला पूर्वीच्या त्या गोष्टींकडे पुन्हा पहावसं वाटलं !! की तो तूच होतास की दुसरच कोणी!! " सुमेधा शांत बोलत होती.
"काळाने रागाची सगळी टोके बोथट करून टाकली बघ !! तू समोर दिसताच फक्त तुला बोलावं एवढंच वाटलं मला !! बाकी पूर्वीच काहीच मनात ठेवलं नाही !! पण एक राग आजही मनात कुठेतरी हळूच कधी बोलतो मला !! तुझ्यावर रागावतो ही !! पण तेवढ्याच पुरते !! " मनोज फक्त बोलत होता.
"माहितेय मला !! तुझ्या मनात आजही थोडा राग आहेच ना माझ्याबद्दल !! आणि तो चुकीचा नाहीच !! तू रागवलास माझ्यावर तो तुझा हक्क होता !! कारण माझ्यावर प्रेम करणारा तूच एक होतास!! " सुमेधा मनोजकडे पहात होती.
"पण त्या प्रेमाला तू कधीच ओळखल नाहीस !! माझ्यापेक्षा तो रमण श्रीमंत आहे आणि मी गरीब !! म्हणून सगळं प्रेम विरून गेलं !! " मनोज असे म्हणताच सुमेधाचा डोळ्यात एक अश्रू दिसू लागला.
"अस काही नाहीरे मनोज !! पैसाच जर सर्वस्व असतं तर त्यावेळी मी तुला लग्नाच वचन दिलच नसतं ना!! "  सुमेधा डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
"जाऊदे !! वचन आणि कित्येक गोष्टी आता पुन्हा कशाला!! रमण कसा आहे ?? " मनोज विषय बदलत म्हणाला.
"महिन्याभरपूर्वी गेला तो!!" सुमेधा एकदम म्हणाली.
मनोजला काय बोलावे तेच कळेना. तो निशब्द होऊन फक्त सुमेधाकडे पाहत होता.
"खूप दारू प्यायचा तो!! त्याचाच परिणाम त्याच्या तब्येतीवर झाला!! शेवटी शेवटी डॉक्टर म्हटले जर यांनी दारू सोडली नाही तर मरण अटळ आहे !! आणि अखेर तेच झाल!! " सुमेधा खाली पाहत बोलत होती.
"खरंच खूप वाईट झाल !! त्याला तुझ्यापेक्षा !! तुझा मुलीपेक्षा !! ती दारू जवळची होती!! " मनोजला काय बोलावं कळेना.
"आपली व्यक्ती जवळ असूनही आपली नाही !! याचच दुःख खूप होत त्याला !! " सुमेधा मनोजला एकटक पाहत म्हणाली.
"बरं चल मी निघते आता !! "
"आलीस काय आणि चाललीस पण लगेच !! " थांब तर थोडा वेळ !! कित्येक दिवसांनी भेटते आहेस!" मनोज विनंती करत बोलत होता.
"सायली आली असेन रे घरी !! मी नाही म्हटल्यावर जरा काळजी करेन ती!! अस कर ना!! या रविवारी घरीच ये !! तुझ्या बायकोला घेऊन !! " सुमेधा घड्याळाकडे पहात म्हणाली.
"मी लग्न नाही केलं !! " मनोजच्या या वाक्याने सुमेधाला काय बोलावे तेच कळेना.
" बरं तू तरी ये !! सायली शी भेट पण होऊन त्या निमित्ताने !!
"बरं !!ठीक आहे !! मनोज.
सुमेधा घरी जायला निघाली. मनोज ती गेली तरी कित्येक वेळ तिथेच बसून होता. जुन्या आठवणी आणि कित्येक गोष्टी आठवत होता. सुमेधा मात्र लगबगीने घरी जायला निघाली. आपल्या मुलीच्या ओढीने. मनोजला रविवारी पुन्हा भेटण्याचे वचन देऊन.
सायली इकडे घरी केव्हाच येऊन बसली होती. आई कुठे नाही म्हणून दरवाज्यात बसून होती. अंधार पडत आला तरी आई कुठे नाही या काळजीने तिचा चेहरा रडका दिसत होता. आईच्या गाडीचा आवाज येताच ती लगबगीने उठली आणि पाहू लागली.
सुमेधा चालत दरवाज्यात आली. तोच सायलीने तिला घट्ट मिठी मारली.
"कुठे गेली होतीस आई तू ?? "
"बाळा !! जरा काम होत म्हणून उशीर झाला !! " चल बर आत.
सायलीला आत घेत सुमेधा तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत होती.
"जेवलीस का ??" सुमेधा सायलीला म्हणाली.
काहीच न बोलता तिने नुसती नकारार्थी मान डोलावली.
"चला बर पटकन मग !! आधी जेवण करूयात !! "
सुमेधा सायलीला घेऊन स्वयंपाक घरात गेली. आपल्या हाताने तिला भरवत तिला कित्येक वेळ बोलत होती. रमण गेल्यानंतर सायली आज पहिल्यांदाच घरात एकटी होती.
"आई !! मला एकटं सोडून नको ना जात जाऊस कुठे!! "
"नाही हा बाळा कुठेच जाणार नाही मी तुला एकट सोडून !! " सुमेधा.
"बरं झोपा चला आता !! "
सुमेधा कित्येक वेळ सायली जवळ बसून होती. अंतरीच्या कित्येक विचारांशी बोलत होती. जणू मनाला म्हणतं होती.

"एकांत मनाच्या तळाशी जणू
माझेच मला का दिसतो आहे
सगळीकडे पसरला तो प्रकाश
पण माझ्याच वाट्यास का अंधार आहे ?? " सुमेधा सायलीकडे कित्येक वेळ पहात होती.

क्रमशः ...

✍ योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...