सहवास !! (कथा भाग १)

    "सरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत  पण अखेर रागचं मनात का ?? त्या एका गोष्टीने पुढच्या २५ वर्षाच  काहीच मोल केलं नाही? मी जळून खाक झाले तेव्हाच! मग आज तिरस्कारही का वाटू नये !! कदाचित मेलेल्या माणसाच्या सर्व भावना तुटतात आणि उरतो तो फक्त देह !! फक्त जाळण्यासाठी!! पण हा देह जिवंतपणी जळतो त्याच काय ??" सुमेधा जळत्या चीतेकडे एकटक पहात होती. मनात असंख्य विचार जळत होते.
"आई !! चल आता !! " सायली आईकडे, सुमेधाकडे पहात म्हणाली.
"नको ग!! थांबते आजुन मी थोडावेळ !! " सुमेधा एकटक त्या चितेकडे पहात होती.
"वाऱ्यासारखी मी , बेफाम मी , पण आयुष्याची कोंडी सोडवताना पूर्ण भांबावून गेले! आपल्या मनात कित्येक गोष्टी तशाच राहून गेल्या !! त्याच्याही आणि माझ्याही!! तो संसार होता की बळजबरी मलाच काही कळले नाही !! पण केला मी !! २५ वर्षे !! न चुकता !! पण माझी वाट कोणती होती हे मी पाहिलच नाही कधी !! " अचानक सरणातून  आवाज झाला आणि सुमेधा घरी जायला निघाली.
"आई !! बाबांची आठवण खूप येते मला !! " सायली सुमेधाकडे पाहून रडु लागली.
सुमेधा सायलीला मिठी मारुन शांत करत होती. पण काही केल्या सुमेधा रडत नव्हती. तिच्या डोळ्यातील अश्रू काहीच का बोलत नव्हते?
"सूमे !! या पोरीला आता तुझ्याशिवाय कोणीच नाही बरं !! काळजी घे तिची !! रमण असा अचानक जाईल असे कोणालाच वाटले नव्हते !! तुझ्यासारखी करती स्त्री तिच्या पाठीशी आहेच!! पण बापाचं छत्र हारवंल की  आयुष्य उघड होत !! " सुमेधाची सासू घरात येत बोलत होती.
"त्याच्या प्रत्येक चुका पदरात घातल्यास पोरी तू !! तुझ्यासारखी पोरगी या वेळी डगमगणार नाही  मला माहितेय !! रमण गेला तरी तू सायलीला बापाची कमी भासू देणार नाहीस!!" सुमेधा फक्त ऐकत होती.
  आपला नवरा गेला तरी सुमेधा अचल होती.अंतरीच्या शोधात होती. मनात काहीतरी राहून गेलं आहे त्याचा शोध घेत होती.
रमण गेला म्हणून सुमेधा कित्येक दिवस कामावर गेलीच नाही. त्याच्या जाण्याने तिलाही खूप आघात झाला होता. सायलीच्या मनाला अजूनही तो धक्का सहन होत नव्हता..पण सुमेधा आता या सगळ्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती.
"आई !! आज तू कामावर जाणारं आहेस ना ??" सायली सूमेधाकडे पहात म्हणाली.
"हो !! का बरं ??"
"मला सोडना कॉलेज मध्ये जाता जाता!! "
"बरं चल पटकन!" सुमेधा गाडीत बसत म्हणाली.
"आई !! तुला बाबांची आठवण येते ??" सायली सहज बोलून गेली.
"हो !! येते ना !! खूप येते !! " सुमेधा चा चेहरा कित्येक भावनांनी बदलून गेला. दुःख ही होत आणि बरंच काही.
"बर थांब थांब!! जाते मी इथूनच !! आणि आई आज मला यायला वेळ लागेल !! " सायली गाडीतून उतरत बोलली.
"बरं ठीक आहे !! सुमेधा सायलीला सोडून निघत होती
"1 मिनिट थांबता  का?? "एका अनोळखीच व्यक्तीने सुमेधाला हटकले.
"कोण आपण?? " सुमेधा त्याच्याकडे पाहत म्हणाली पण पुढच्याच वेळी तिच्या आणि त्याच्या दोघांचे चेहरेच बदलून गेले.
"सुमेधा तू ?? "
"मनोज ?? " सुमेधा प्रश्नार्थक चेहरा करून बोलत होती.
"हो!! मनोजच आहे मी !! आणि इकडे काय करतेयस तू ?? "
"मुलीला सोडायला आले होते !! " सुमेधा त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"पण असा अचानक भेटशील अस वाटल नव्हत बर मला !! " सुमेधा त्याच्याकडे अगदी मनसोक्त बोलत होती.
"बरं इथेच बोलणार आहेस की !!"मनोज अगदी मनमोकळेपणाने बोलला.
"आता मी थोडी घाईत आहे !! पण आज संध्याकाळी भेटुयात का नक्की ?? "
"ठीक आहे !! काहीच हरकत नाही !! पण कुठे भेटायचं ??" मनोज तिच्याकडे पहात म्हणाला.
"आपल्या पूर्वीच्या जागी ?"
"नक्कीच !! तुझ्या आधी येऊन बसेन बर मी!!"  मनोज सुमेधाकडे पाहून मिश्किल हसला.
"होरे!! येईल मी वेळेत !! बरं येते मी !!
या अचानक घडलेल्या भेटीत सूमेधाला एक सुखद धक्का दिला. तिला कधी एकदा संध्याकाळी मनोजला भेटेन अस झाल होत.

क्रमशः ...

✍योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...