सुनंदा ..!!( कथा भाग -२)

"पण आई त्या दुसऱ्या जगात आहे तरी काय अस?? " श्याम सूनंदाचा हात हातात घेत म्हणाला.
सुनंदा कित्येक वेळ फक्त श्यामकडे पहातच राहिली. तिला काय बोलावे तेच कळेना. काय आहे तिथे ?? खरंच मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो,पण सुनंदा काहीच बोलली नाही, श्याम शाळेत जायला निघाला. सगळं आवरून तो चालत चालत शाळेच्या जवळही आला.
"काय श्याम रातीला कोण होत घरी ??" गावाची टवाळ पोर श्यामकडे बघून जोरात हसू लागली. पण श्याम सात वर्षाच पोर ते त्याला काहीच कळलं नाही. तो न बोलता पुढे निघून गेला. त्याच्या वर्गातली पोर मैदानावर खेळतं होती. ते पाहून श्यामही त्याच्या सोबत खेळायच म्हणून गेला.
"मी पण खेळू !!! " श्याम मित्राला विचारत म्हणाला.
"नको रे बाबा !! तुझ्या सोबत खेळताना बघितल तर बाप मारल मला !! " वर्गातला एक मुलगा श्यामला म्हणाला.
"का पण !!!"
"तू म्हण रांडेचा पोरगा आहेस म्हणून !!!"
"म्हणजे काय ???" श्यामला काहीच कळलं नाही.
"मला पण नाही माहिती!! पण बाप म्हणत होता मला!!"  जा बाबा इथून तू  आता!!" तो वर्गमित्र त्याला अगदी हाकलून दिल्या सारखं बोलला.
  श्याम कित्येक वेळ एकटाच बसून त्या मैदानावर त्याचाकडे पहात बसला. नक्की आपलं काहीतरी चुकतंय याच त्याला राहून राहून वाटत होत. पण काय ? रांडेचं पोर म्हणजे तरी नक्की काय. माझी आई माझ्यावर किती प्रेम करते. तिचा मी मुलगा आहे याच तर मला कौतुक वाटतं ना. खरंच ही दुसरी दुनिया वाईट आहे ना खूप!!! श्याम कित्येक विचाराणं मधे बुडाला. दिवसभर त्याच लक्ष शाळेत कुठे लागलच नाही. शाळेची वेळ बघता बघता निघूनही गेली. श्याम घरी जायल निघाला. घरी पोहचताच त्याने आईला विचारलं.
"आई , मला तुला काही विचारायचं आहे ??"
"काय रे श्याम , आताच तर शाळेतून आलास जा जरा हात पाय धुऊन ये!! " श्याम बाथरूम मधे जाऊन हात पाय धुऊन आला. पण त्याने पुन्हा विचारलं.
"आई , विचारू का ??"
"बरं , विचार श्याम !! "
"आई , रांडेच पोर म्हणजे काय ग ??"  श्याम ने अस विचारताच सुनंदला काय बोलावं तेच कळेना.
"श्याम , काय बोलतोय तू हे !! जा जाऊन अभ्यास कर."
"सांग ना आई , मला शाळेत सगळे रांडेचं पोर का म्हणत असतात?"
"श्याम, कोणी काहीही म्हटलं तरी आपण त्याकडे लक्ष नाही द्यायचं !! "अस म्हणून सुनंदा घरात निघून गेली.
  सुनंदा कित्येक वेळ डोळ्यातील टिपूस गाळत घरातच बसून होती. मनात असंख्य विचार करत होती " हा समाज मला नाव ठेवतो. पण याच समाजाने मला इथे आणून ठेवलं हे कोण का सांगत नाही. थोड्याशा पैशासाठी मला विकणारा माझा बाप पुन्हा गिऱ्हाईक म्हणून आला तर नवल काय वाटून घेऊ मी. आज माझा मुलगा शिकून मोठा व्हावा अस मला वाटत तर यात माझं काय चुकलं? का माझ्या मुलानेही इथेच चोऱ्या माऱ्या करून आयुष्य तुरुंगात घालायचं! मला वेश्या करणारा हा समाज पहिले स्वतःचा आंधळ्या वासना का पहात नाही. मला सुधारायचा म्हटलं तरी हा समाज मला जवळ करत नाही. प्रत्येक वेळी जिथे जावं तिथे वासनेने अंध झालेली कुत्री फिरत असतात. मग मी लाज का बाळगावी. दहावीत उत्तम गुण मिळाल्यावर मी नाचत घरी आले होते, तेव्हा माझ्या बापाने माझा हिशोब केला होता घरी. ओढत घेऊन जाताना कुठे गेला होता हा समाज. ?? "
"सुनंदे !!! " वस्तीतली आजी सुनंदाला हाक मारत घरात येत होती. सुनंदा डोळे पुसत स्वतःला सभाळून घेत होती.
"काय झाल ग !! रडतेस का ??" आजी सुनंदाची विचारपूस करू लागली.
"काही नाही!! नेहमीच दुसर काय !!! "
"कोण काय म्हणालं!!" आजी सुनंदाकडे पाहत म्हणाली.
"श्यामला आज कोणीतरी शाळेत रांडेचा म्हणाला !! तर श्याम अर्थ विचारत होता मला!! "
"बाई ग !! एवढं मनाला नाही लावून घ्यायचं!! हे का नवीन आहे आपल्याला!! तू बाकी मनानं खूप हळवी आहेस बघ !! सुनंदा या जगात आणि त्या जगात खूप अंतर आहे बघ !! एकदा का इकडे आल की सुटका नाही!! आणि ते जग काय म्हणत याचीही परवा करायची नाही!!" आजी अगदी मनातल बोलू लागली.
"मलाही खूप मोह होता ग !! या दुनियेतील आपला प्रवास संपवून त्या दुनियेत जाण्याचा!! पण सारी गिधाड टपून बसतात आपला फडशा पाडायला. "आजी सुनंदा कडे सगळं काही बोलू लागली.
"म्हणून , हे असलं जीवन जगायचं???" सुनंदा भरल्या आवाजाने म्हणाली.
"हे आपलं जीवन आहे पोरी!! आपलं काम फक्त वासना पूर्ण करण्यासाठी !! पण आपण माणुसही आहोत हे मान्य कोणी करणार नाही. आपाल्या मनात असंख्य भावना आहेत हे कोणी मान्य करणार नाही. आपण फक्त याच्या उपभोगाची वस्तू !! आजी पदराने डोळे पुसत म्हणाली.
"ये सुनंदा!!! दार उघडं !!! " बाहेरून कोणी इसम मोठ्याने ओरडून बोलू लागला.
"कोण आहे !!! " सुनंदा दरवाजा उघडत म्हणाली.
"सरपंच तुम्ही !!! आणि यावेळी ?? "
"आता काय तुला विचारून येत जाऊ का मी ??"  सरपंच दारूच्या नशेत सुनंदा वर खेकसला.
" नाही , तसं नाही !! पण लवकर आलात म्हणून विचारलं!!! "
"बरं चल!! बसं कर बोलणं !! ये म्हातारे निघ चल आता !!! मला निवांत पडायचं आहे इथे!! " सरपंचाच्या  या बोलण्याने आजी बाहेर निघून गेली.
"आई, दरवाजा का बंद केला ??" श्याम बाहेरून हाक मारत आईला बोलू लागला.

क्रमशः

✍ योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...