मुख्य सामग्रीवर वगळा

सुनंदा...!! (कथा भाग १)

    या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंद राहायचं आहे. इथे लज्जा माझ्यासाठी  फक्त शब्द आहे पण तरीही समाजानं सोडून दिलेली लाज हळूच लपवायची आहे. या शिकलेल्या आणि इज्जतदार लोकांना आपल्या वासना आणि इच्छा माझ्या इथे पूर्ण करायच्या आहेत. हो मी समाजानं बाजूला केलेली पण त्याच्या उपयोगाची वेश्या आहे! हो मी फक्त उपयोगाची . माझं नाव सुनंदा ! मला माझी कथा सांगायची आहे.पण सुरुवात कुठून करावी हाच मुळी प्रश्न आहे ,शेवट मात्र माझा वाईटच. मनाच्या कोपऱ्यात एक स्त्री आज बोलते आहे. माझी कथा ती सांगते आहे. मनात खूप काही राहील की ते आपोआप ओठांवर येतं तसच माझं झालेलं आहे.
  छोट्या खेड्यात राहणारी मी, गावाच्या वेशी बाहेर आमची वस्ती. रात्र झाली की आमच्या वस्तीकडे येणारे खूप लोक असतात. अगदी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ही येतात. पण तरीही आमच्याकडे अगदी तुच्छतेने पाहिलं जात. माझा मुलगा सात वर्षाचा. त्याला कधी या लोकांचं वागणं कळलच नाही. कारण त्याने जग अजुन जवळून पाहिलच नाही. तुम्ही म्हणाल वेश्येला मुलगा?? पण हे खरं आहे! मला मुलगा आहे. त्याची आई म्हणून मी सर्व कर्तव्य करते.पण कधी कधी मला त्याची आई असल्याची लाज वाटते.
"ये सूनंदे !! उठ पटकन!! तुझा नेहमीच माणूस आलाय बाहेर!! " सुनंदा वहीची पानं मिटत उठली आणि बाहेर गेली.
"शेठजी तुम्ही !! या ना !! " शेठजी डोक्यावरची टोपी सांभाळत अगदी चोर पावलाने आता गेला.
"सुनंदे , आज रात्र इथेच राहणार आहे मी. तुझ्या सोबत असल की मला बर वाटत बघ, बायको नुसती डोक्याला ताप करती!!"दारू पिऊन गावचा सरपंच सुनंदाकडे रात्री झोपायला आला होता.
"राहा ना सरपंच !! पण पोराला जरा बाहेर झोपवून येते!! "अस म्हणून सुनंदा आपल्या पोराला बाहेर झोपवण्यास आली. श्याम ,सूनंदाच पोर ते आई जवळ झोपायचा हट्ट करत होते. पण सुनंदा त्याला वस्तीतल्या मोठ्या आजीकडे झोपवून आली.
"सुनंदे !!"  सरपंच सूनंदला हाक मारत होते. हा सरपंच सूनंदकडे मनातल अगदी मनमोकळे पणाने सगळं सांगणार.
"सुनंदा !! तुझ्याकडे एक जादू आहे बघ !! मला तुझ्याकडे आल की बर वाटतं! ती माझी कजाग बायको माझा नुसतं छळ करते. पण आमच्या शेजारची ती चंदा , मस्तच आहे. वाटत कधी कधी की तीच माझी बायको असती तर किती बर झालं असतं!! " सरपंच सुनंदाकडे पाहत बोलत होता.
"पण सरपंच ती तुमची लग्नाची बायको !! तिच्या बद्दल अस बोलण चागलं नाही!!"  सुनंदा चां जीव आपल्या पोरासाठी तळमत होता.  पोर रात्रभर रडेन पण माझ्याशिवाय झोपणार नाही हे तिला माहीत होत.
"कसली लग्नाची बायको!! कधी प्रेम करायचं माहिती का तिला!! तिच्या असल्या वागण्यानं तर मी इथ आलोय!! " सरपंच अगदी जोरात बोलत होता.
  सरपंचाच्या या  बोलण्याने सुनंदाच्या मनात विचारांचा गोंधळ झाला." वासना माणसाला नात्यातील गोडवा ही विसरायला भाग पडते ना!! अस तिला वाटू लागलं. या नष्ट होणाऱ्या शरीराच्या तात्पुरत्या गरजा, तरीही सर्वांना या हव्याच ना. भावनेच्या पलिकडे जाऊन याचा प्रभाव जास्तच असतो मनातल्या विचारांना बंद पाडते आणि उरतो फक्त सुखासाठी केलेला तो प्रयत्न. कशासाठी हा हट्ट तर फक्त वासना पूर्ण करण्यासाठी."
"आई !!!" विचारांच्या तंद्रीत असलेली सुनंदा अचानक भानावर आली. दरवाजा उघडत बाहेर श्याम तिला मिठी मारू लागला. तो त्या आजीच्या घरातून निघून आला होता.
"आई !! मला तुझ्या जवळ झोपायच आहे." श्याम आत मधे पहात म्हणाला.
"ये सुनंदा !! कोण आहे बाहेर!! आजुन गिऱ्हाईक आल असल तर निघून जा म्हणाव!! " सरपंच पलंगावर पडून म्हणाला.
"नाही सरपंच !! मुलगा आहे माझा!! " सुनंदा आत बघत म्हणाली.
"पोरगा आन तुझा !!" सरपंच बाहेर बघत म्हणाला.
"होय , माझ्या जवळ झोपायच म्हणून हट्ट करतोय!!"
"ये भाडकाव !! जाऊन निज की गप्प!! जरा शांततेसाठी आलो तर याची कटकट !! " सरपंच पोराला धक्का मारत आत निघून गेला. सुनंदाच्या डोळ्यात राग होता पण तिला काहीच करता येत न्हवत. ती शांतपणे श्यामला समजावून सांगत होती. अखेर ते पोर तसच रडत तिथेच झोपी गेले
  श्याम तसच दरवाजा बाहेर झोपी गेला. पण नाईलाजाने सूनंदाला आता जावं लागलं, ती रात्र सुनंदाला कधीही विसरता येत नाही अशी होती. आपल्या पोटचा गोळा बाहेर तसाच झोपी गेला होता आणि आपण आत असूनही काही करू शकत न्हवते याच दुःख तिला होत.
  पहाट होताच सरपंच चोर पावलांनी बाहेर निघून गेला. अगदी सुनंदाला कधी भेटलोच नाही या आविर्भावात तो निघून गेला. रात्रभर श्याम बाहेरच झोपला होता. सुनंदा पटकन बाहेर गेली आणि आपल्या पोराचे कित्येक मुके घेत ती त्याची माफी मागू लागली. "बाळा माझं चुकल रे !!" मला माफ कर!!" श्याम आईला घट्ट मिठी मारत होता.
  सकाळ होताच सुनंदा श्यामला शाळेत जाण्यासाठी आवरू लागली. पण श्याम काही केल्या जायला तयारच न्हवता.
"पोरा शिकून मोठा झालास तर या नरकातून बाहेर पडशील तू!" सुनंदा श्यामकडे पाहत म्हणाली.

क्रमशः

✍योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...