मनातल थोड

   डोळ्यात पाणी असते आणि मनात एक खंत. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचे परक्याचे भाव मनात दुसरं काय आणु शकतात. रोज अगदी न चुकता आपली आठवण काढणारी व्यक्ती अगदीच परक्या सारखी वागू लागली तर काय करावे हेच कधी कळत नाही आणि सुरू होतो उनिवांचा खेळ. कमीपणाचे काही भाव आणि नात्यांची तुटलेली विण बाकी काय असू शकते. खरतर खूप सोपं असतं मनातल सांगणं , नात्यात असे दुरवे आले तर मनातल अगदी बोलून टाकावं त्या व्यक्तीला आणि सगळे कींतू काढून टाकावे अस खूप वेळा वाटत आणि उरतो काही गोष्टींचा विचार. पण का होतो हा दुरावा कधी शोधलय कोणी!!  नात्यातला अतिरेक याच उत्तर असू शकते का ?? की आपली आपले पणाची भावना सगळ्या काही बिघडून टाकते. खरतर तुम्ही म्हणाल नात्यातील अतिरेक  म्हणजे तरी काय नक्की !! की नात मर्यादेत राहून ठेवायचं. नाही ना !! मग का होतो हा दुरवा नात्यांत आणि ती तुटलेली विण उरते फक्त.
   शोधलं तर नक्की कारण सापडत. पण शोधायचं नाही म्हटल्यावर उरतेच काय!!  चूक कोणाची हा प्रश्न नात्यात होऊच शकत नाही. उरलेल्या गोड आठवणी आठवत बसायचं एवढंच राहत तेव्हा. आणि आपल्या नात्यांची झालेली ती अवस्था पहात रडायचं. अश्रूही कदाचित रागावतील कधी असच नात जीवनभर ठेवलं तर. नाही का ?? म्हणूनच वाटलं की सांगून मोकळं व्हायचं त्या व्यक्तीला की माझ इथे चुकलं आणि तुझ तिथे. नात्यात खरतर चुका विसरायचा असतात पण चुका फक्त आठवणाऱ्या व्यक्ती नात कधी जपू शकणार नाहीत हे तितकच खर आहे ना!!
   वाटलं तर केलं नात आणि गरज संपली की तोडून टाकलं याला नात म्हणावं तरी का?? तो सरळ सरळ एक हिशोब असतो. हिशोब असतो तुटलेल्या भावनेचा, हिशोब असतो गोड आठवणींचा. गरेज पुरत नातं संपुष्टात यायला असही वेळ लागत नाही. पण ज्याला हे कधी कळलं नाही त्याला मनावर आघात झाल्या शिवाय राहिला नाही. नात नात आणि फक्त नात.  विचाराचा कल्लोळ आणि ती व्यक्ती, पण मी म्हणेन एवढं विचार करूच नये ,तुम्ही आता हे  वाचताना ज्याचा विचार करत आहात त्याला पहील मनातल सांगून पाहा.
बघा कदाचित तुटलेल्या नात्याला पुन्हा पालवी फुटेल. हो कदाचित ती व्यक्ती तुम्हाला पहिल्या सारखी बोलणारी नाही पण मनातल सगळं सांगितलं ही भावना तुम्हाला स्वस्थ बसू देईन.

करून तरी पाहा ...😊😊😊😊
-योगेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...