मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग -३)

समीर घाईघाईत घरातून बाहेर पडला. त्याला कधी एकदा सचिनला भेटेन अस झाल होत. मनातल वादळ त्याला शांत राहू देत न्हवत. खरंच तुषार आणि सायली एकमेकांवर प्रेम करतात का ? मग ही गोष्ट मला सायलीने का सांगितली नाही. अश्या कित्येक विचारात समीर सचिनच्या घरी आला. तिथे पोहचताच त्याला तूषारही तिथेच भेटला. आता त्याला काय बोलावे हेच कळत न्हवते. तुषार समोर कसे बोलणार सायली बद्दल म्हणून तो गप्पच राहिला.
"काय समीर कस काय येणं केलंस सचिनकडे?" तुषार थोडा मिश्किल हसत म्हणाला.
"काही नाहीरे सहजच आलो होतो!!"
"सहजच!! बरं बरं ठीक आहे !! अरे सायली होती कारे घरी?" तुषार असा विचारेन अस समीरला कधी वाटलं ही न्हवत.
"काही पाहिलं नाहीरे !!" समीर बोलून गेला.
"अरे आज भेटणार होतो आम्ही !! तिकडेच चलो होतो म्हणून विचारलं की ती निघाली असेन तर मला जावं लागेल!!" तुषार या बोलण्याने समीरला काय बोलावे तेच कळेना. तो तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला.
"चल मी जातो आता!!"
"अरे समीर आलास काय आणि चालास काय थांब थोडा वेळ!!" सचिन समीरला म्हणू लागला.
"नको अरे!! मला काम आहेत!! जायचं होत बाहेर!! "
  सचिनला तुषार जे बोलला त्यावर विश्वासाचं होत न्हवता. सायली आजपर्यंत माझ्याशी का लपवत होती. की तुषार आणि ते भेटतात म्हणुन. कधी तिने याचा विषयही का काढला नसेन. सायली का वागली आसेन माझ्याशी अशी. कित्येक विचाराचा कल्लोळ समीरच्या मनात होता. ती सांज वेळ होती आणि समीर घरी येऊन गच्चीवर बसून सुर्यास्त पहात होता. कदाचित आजही त्याला फक्त त्याचीच साथ होती. वहीच्या पानावर तो लिहू लागला मनातलं सगळं काही मांडू लागला.

"नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे
कधी भासे मझ ते आपले
कधी वाटे ते परक्याचे

कदाचित चुकली असेन
मनात समजूत नात्यांची
कधी आपले दुखावले
तर कधी हासू हे परक्याचे

साद घालत आपुल्यास तेव्हा
मी शोधले माझ्या मनास
कधी भेटला एकांत नी
कधी भेटला उपहास

नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे!!!

सुर्य ही आज केव्हाच मावळला होता. समीर कित्येक वेळ तिथेच बसून होता. अंधार झाला तरी तो गच्चीवरच होता. तेवढ्यात समीरची आई तिथे आली कित्येक वेळ समीर आलाच नाही म्हणून त्याला पाहायला वर आली.
"समीर अरे अंधार झाला तरी आज तू गच्चीवर कसा थांबला?" आईच्या या बोलण्याने समीर अचानक भानावर आला. त्याच लक्ष कुठेतरी पार विचारत गडून गेलं होत.
"काही नाही आई असच आज बसावस वाटलं म्हणुन!!!"
"सुर्यास्त नंतर तुला ती संध्याकाळ उदास वाटते ना ?? तरीही तू वर आहेस ?? काय झाल समीर सांगशील??" आई समीरला मनापासून विचारू लागली.
"आई बघ ना!! काल परवा पर्यंत आपली वाटणारी माणसं क्षणात परकी वाटायला लागतात ना!!! समीर आता आईला मनातल बोलत होता.
"कोणा बद्दल म्हणतोय समीर ??"
"सहजच वाटलं अस म्हणुन!!कित्येक क्षण ते असे सहज विसरून जातात!! आपल्याला त्यांच्या बद्दल काही माहितच नाही अस वाटायला लागतं!!"
"समीर!! आयुष्यात माणसं खुप येतात, काही सतत सोबत असतात तर काही क्षणाचे सोबती असतात!! " आई समीरकडे पहात म्हणाली.
"पण आई समोरच्याला इतकं विसरता येत??"
"विसरायचं असेन तर विसरायचं !! शेवटी आयुष्य कसं जगावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे!! तुझ्या आयुष्यात अस कोणी आल तर याच वाईट ते का वाटावं!!
समीर आणि आई बोलत होते कित्येक मनातले किंतू समीर आईला विचारत होता त्यांचं हे बोलण चालू असतानाच. सायली घरी येताना दिसली. समीर तिला पाहून थोडा गोंधळला पण काहीच न बोलता तो गच्चीवरून खाली आला.
"काकु , तुमच्याकडे काम होत!!" सायली समीरच्या आईकडे पाहत म्हणाली.
"हो आलेच!! "
समीर सायली कडे न पाहताच बाहेर निघून गेला. सायलीला हे लक्षात आल पण ती काहीच बोलली नाही.
"काकु समीर असा का निघून गेला??"
""तुला बोलला नाही तो??" आई सायलीला विचारत होती.
"नाही!! बरं काकु उद्या आईने तुम्हाला बोलावलंय आणि समीरला पण सांगा ये म्हणुन! उद्या माझा वाढदिवस आहे ना म्हणुन!!"
"अरे वा !! नक्की येऊ आम्ही!! "
"बरं !! येते मी काकु!!"
सायली निघुन गेली. समीर आपल्याशी का बोलला नाही याचा विचार करत ती घरी गेली. उद्या माझा वाढदिवस आणि समीर आला नाहीतर कस होईन. तुषार आणि सचिनही येतीन वाढदिवसाला. पण समीर असा वागला का माझ्याशी!! मला त्याला काहीतरी बोलायचं होत पण ते राहूनच गेलं. जाऊदे उद्या येऊन तेव्हा बोलेन मी नक्की.. पण आलाच नाहीतर ..??  अश्या कित्येक विचारत सायली होती.
पण उद्या आला की असा का वागतोय ते मी विचारणार आहे मी त्याला ...!!

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...