मुख्य सामग्रीवर वगळा

लोक काय म्हणतील!!

  लोक काय म्हणतील !! या एका वाक्यात आपण कित्येक वेळा आपल्या मनातील गोष्टी करतच नाहीत. मला ते करायचं होत पण लोक काय म्हणतील म्हणून मी ते केलच नाही असे म्हणत किंवा मनात असेच विचार ठेवून राहणारे कित्येक असतात. आजही या गोष्टीचा परिणाम आपल्या मनात होताना दिसतो. मला आजही अनुभव येतात. आपण कित्येक नवीन गोष्टी करताना पहिले लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसतो. आणि आपण आपल्याच मनाला मुरड घालत राहतो.
  खरंतर लोक काहीच म्हणत नसतात किंवा माणसांना काही म्हणायच ही नसत पण आपलेच मन कित्येक तर्कवितर्क काढत बसते आणि जे करायचं ते राहून जात. मला वाटतं याचा विचार खरंच करणं तितकं बरोबर नसत. मी परीक्षेत नापास झालो, मग लोक काय म्हणतील असे आपण विचार करत बसतो किंवा आपले मित्र पास झाले याचा. खरं तर याचा विचार करत बसण्या पेक्षा आपले मित्र आभ्यासात आपल्या पेक्षा कुठेतरी पुढे आहेत आणि आपल्याला अजुन तयारी करायला हवी आणि त्या कामाला लागले पाहिजे . कारण पुढे तुम्ही यशस्वी झाल्यावर हेच लोक तुमची स्तुती करणार हे मात्र खरं. मनातल सांगताना किंवा एखादी गोष्ट करताना आपण स्वतःचा विचार करायला हवा असे मला वाटते. लोक काय म्हणतील म्हणून आजही कित्येक स्वप्न मनातच राहून जातात. चार ओळी सुचल्या आणि त्या कशाही असो मला त्या मांडता  आल्या याच मनाला कौतुक असायला हवं. कारण आपण व्यक्त झालो याला महत्त्व असतं.
  लोक काय म्हणतील जर मी हे केलं तर, अस जर कित्येक थोर विचारवंत म्हणत बसले असते तर त्याचे विचार आज आपल्या पर्यंत आलेच नसते. वेडात विर दौडले सात!! यांनी विचार नाही केला लोक काय म्हणतील याचा, स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असेच विचार करत बसले असते तर हिंदवी स्वराज्य मनातच राहील असतं. सावरकरांनी समुद्रात उडी मारण्या आधी लोक काय म्हणतील याचा विचार केला असता तर !! असे कित्येक उदाहरण  देता येतील. तुम्ही जे करता त्याला लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं नसत तर महत्त्वाचं असत ते तुम्ही किती मनापासून ती गोष्ट करता आहात याच.
खरंतर तुम्ही कित्येक गोष्टी पाहू शकता ज्या पहिले दिसायला खुप छोट्या दिसतात पण ती करण्याची ताकद त्या गोष्टी मोठ्या करते. कित्येक विद्वान , कित्येक महापुरुष  यांनी या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टींना सुरुवात केली आणि ते मोठे झाले. कारण त्यांची त्या कामा बद्दल तेवढी तळमळ होती.
  आपण लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण जे करणार आहोत त्याबद्दल  आपली शक्ती, आपली चिकाटी किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जे विचार मांडत आहात तेच लोक ऐकतील पण जर तुम्ही लोकाचं ऐकत बसलात तर तुम्ही फक्त ऐकत राहाल. आज इतिहासाचे कित्येक पाने उलटून पाहिल्यावर आपल्याला असे दिसेल की कित्येक अशक्य गोष्टी शक्य झाल्या. कारण त्यांचा स्वतःवर जास्त विश्वास होता. लोक किंवा समाज हा तुम्हाला दोन्हीही बाजूने बोलेल, फक्त फरक एवढाच असतो की कधी तुमच्या बाजूने बोलणारे जास्त असतील आणि कधी तुमच्या विरोधात बोलणारे जास्त असतील. पण जे बोलतात त्याच मत कधीच होऊ शकत नाही ती एक प्रतिक्रिया असू शकते. विरोध किंवा सहभाग होतच राहणार पण यात आपलं मत खोडून जाता कामा नये. कारण तुम्हाला तुमचं मत असणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला विरोध होईल किंवा सहभागही असेल पण लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या मनाला मुरड कधीच नको.
  शेवटी कसं असत , आपण जे करतो त्याला महत्त्व असतं. या लोकांच्या समूहात तुम्ही नक्कीच छान राहाल पण स्वतःच अस्तित्व हवं असेन तर याच समाज, लोक यांचा काय म्हणतील हा विचार मनाला कधीच स्पर्श करू द्यायचा नसतो. नाहीतर तुम्ही फक्त तेच करू शकाल जे हा समाज ही लोक बोलतील, तुमचं स्वतःच अस मत काही उरणारच नाही. शेवटी विचार आपणच करायाचा असतो लोकांनी नाही ...!!
-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...