मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग ६) शेवट

सतत सोबत हवी वाटणारी व्यक्ती आता नकोशी का वाटावी. कदाचित नात आता उरलेच न्हवते. उरल्या होत्या फक्त समज गैरसमज याच्या वाईट आठवणीं. मी कदाचित चुकलो असेन पण माझं प्रेम आजही तसच आहे. कदाचित समीर आणि सायलीच मन हेच बोलत असेल. समीर आता जाण्यासाठी तयार झाला होता. सायलीला त्याने जाऊ नये असच वाटत होत. कित्येक दिवस एकमेकांना एका शब्दानेही ते बोलले न्हवते.
"समीर , तुझ्याशी बोलायचं आहे थोड!!" समीरची आई समीरकडे पहात म्हणाली.
"काय आई !! बोलणं!!! "
"कित्येक दिवस झाले मी एक गोष्ट पाहतेय !! तू सायालीशी काहीच बोलत नाहीस , ती आली की निघून जातोस !!  भांडणं झाल का तुमचं ??" आईच्या या अनपेक्षित प्रश्नाने समीर गोंधळून गेला.
"नाही आई , काहीच नाही झाल !! "
"मग मध्ये तिच्या वाढदिवसाला पण नाहीस आला!!काय झालंय का मला सांग !! "
"आई ,कित्येक गोष्टी मला नाहीत पटत, माझ्या प्रत्येक गोष्टीत मी तिला जवळ केलं पण ती मलां काहीच सांगत नाही!! "
"समीर नात्यांमध्ये कोणी काही सांगावं याच बंधन नसतं !! तुझ्या वहीतली एकही कविता तू जिच्यासाठी लिहिली तिला सांगितली नाहीस!!पण तिच्या नजरेत तुला आपल करण्याची ओढ कधी दिसलीच नाही!! समीर मी आई आहे तुझी !! त्या दिवशी सायली समोरून गेल्यावर तू कविता म्हणाला होतास तेव्हाच मी तुझ्या नजरेत तिच्याबद्दल प्रेम वाचलं होत!!" समीरची आई समीरला सगळं काही मनातल सांगत होती.
"तू तिला बोलला नाहीस !! पण तुलां ती तिच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवशी बोलवायला आली !! "
"पण आई तिला मला बोलायचं नाही आता !! आणि मीही नाही बोलणार तिला !! " समीर आईकडे पाहत म्हणाला.
"तिला बोलायचं नाहीये हे तू कस ठरवलं!! सतत काही कारण काढून ती माझ्याकडे येते पण तिला तुला बोलायचं असतं!! आणि तू प्रत्येक वेळी निघून जातोस!!"
समीरला काय बोलावं तेच कळेना तुषार आणि सचिनचं ऐकून आपण मोठी चूक तर केली नाहीना असे त्याला वाटू लागले. तो कित्येक वेळ सायली चा विचार करू लागला. खरंच आपण चुकलो याची जाणीव त्याला झाली होती.  कारण आपण सायलीला बोलायला हवं होत, गैरसमजच, विचारांचं चक्र बंद करून टाकते आणि उरतो फक्त अंधार. समीर आता परगावी जाण्यास निघणार होता. या सर्व गोष्टींचा विचार करणं बंद करायचं आणि आपण नव्याने सुरुवात करायची अस त्याने ठरवलं होत.
  सगळी तयारी झाली होती. समीरची आई अश्रू अनावर होऊन समीरकडे पाहून रडत होती. ज्याच्याशिवय एक दिवस राहू शकत नाही तो समीर आता तिला सोडून परगावी चालला होता. आईचा आशीर्वाद घेऊन तो बाहेर पडला तसा ,सायली समोरच उभा होती.
"कायमचा निघून चाललास??" सायली अचानक बोलून गेली.
"का??"
"तिकडे नोकरीची संधी आली म्हणून!!" समीर तिच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"माझ्यापासून दूर जायचं आहे म्हणुन सांग ना सरळ!! मी चांगली मुलगी नाहीये ना म्हणून ना ?? "
"अस का म्हणतेय सायली !!! तू चांगली मुलगी नाहीस अस मी कधी म्हणालो का ??"
"हो म्हणाला होतास ना !! की मी मागे असते तुझ्या सारखं !! मी वाईट आहे !! " सायली डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
"तुला वाईट म्हणणं शक्यच नाही!! "
कित्येक वेळ दोघं एकमेकांशी बोलत होते. सायली आणि समीर यांना आपल्या चुका कळून आल्या होत्या.
भांडले ही दोघे. समीर आता जाण्यास निघाला होता. पण सायली त्याला जाऊच देत न्हवती. गैरसमज किती वाईट असतो हे दोघांना कळून आले होते.
"मग !! जायचं परगावी अजुन !! मला सोडून !!! " सायली समीरकडे पाहून म्हणताचं.
"नाही जाणार आता !! "
"छान , आणि आधीच का नाही बोललास तू मला !! किती ते गैरसमज माझ्याबद्दल !! " आणि यापुढे कोणाचही ऐकायचं नाहीस कळलं!! "
"हो बाबा कळलं मला !! " समीर माफी मागत म्हणाला .
"चल संध्याकाळ झाली !! गच्चीवर जायचं नाही का आज ??" सायली मिश्किल हसत म्हणाली.
"तुझी सोबत हवी आज मला तिथे !! "
दोघेही कित्येक वेळ गच्चीवर बसून तो सुर्यास्त पहात होते. सायलीकडे पाहत समीर म्हणाला.

" "कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे

नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!

कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!"
"तूच लिहीस आहेस ना ?? " सायली समीरला विचारू लागली.
"हो !! "
"माझ्यासाठी?? "
"नाही !!! तो सुंदर सूर्यास्त होतो ना त्यासाठी!! " समीर मस्करित सायलीला म्हणाला.
  त्या सुंदर सूर्यास्ता मधे समीर आणि सायली कित्येक वेळ गच्चीवर बसून होते. गैरसमज याचा सूर्यास्त केव्हाच झाला होता . उरला होता फक्त सुंदर क्षणाचा सूर्यास्त .... !!!

*समाप्त*

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...