हळुवार त्या पावसाच्या सरी
कुठेतरी आजही तशाच आहेत
तो ओलावा आणि त्या आठवणी
आजही मनात कुठेतरी आहेत
चिंब भिजलेले ते क्षण
आजही पुन्हा भेटत आहेत
पण त्या पावसात आज मला
त्या सरी का शोधत आहेत
हरवलो असेन मी कुठेतरी
त्या प्रत्येक थेंबाशी बोलत आहेत
माझेच मला मी न सापडावे
इतके का ते मला अबोल आहेत
पण तुझ्या असण्याचे ते आज
सर्व काही सांगत आहेत
प्रत्येक सरीत त्या आठवणी
तुलाच का पहात आहेत
हे मन माझे वेडे
तुझेच भास होत आहेत
प्रत्येक क्षणात चिंब भिजुन
तुझ्याच आठवणीत रहात आहेत
का अशा ह्या पावसाच्या सरी
फक्त तुझ्याच आठवणी सांगत आहेत
जणु तो ओलावा आणि त्या आठवणी
चिंब पावसात भिजत आहेत
✍योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply