मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग -२)

"काहीही म्हणते आई !! " समीर मनातल्या मनात म्हणाला.
सायली घरातून बाहेर येत समीरकडे पाहू लागली. कित्येक वेळ ती तिथेच उभा होती. समीर आणि तिची भेट सारखीच होत असे. तो सतत तिच्या नजरेस पडत असे. दोघांमध्ये येता जाता बोलण होत.
"समीर अरे मला तुझी थोडी मदत हवी होती!!"  सायली जाणाऱ्या समीरकडे पाहत म्हणाली.
"अरे वाह !! सायलीला चक्क माझी गरज पडावी!! क्या बात है!! " समीर सायलीकडे हसत म्हणाला.
" हो अरे !! मला काही विचारायचं होते तुला !! "
" विचार ना !! " समीर उत्सुकतेने म्हणाला.
"नाही जाऊदे !! नंतर विचारते !!! आत्ता नको!! "
"सायली विचार तरी !!!" समीर सायलीला म्हणाला.
"समीर माणूस प्रेमात पडलेले कसे कळते रे !!" सायली अचानक म्हणून गेली.
समीरला या प्रश्नाचं उत्तर कसे द्यावे तेच कळतं न्हवते. तो कित्येक वेळ शांत राहिला.
"तुला का हे विचारावं वाटलं सायली? कोणाच्या प्रेमात पडली आहेस का??
" नाहीरे !! असं काही नाही .!! सहजच विचारते तुला मी!! "
"पण सायली प्रेमात पडलेले कळतं अस नाही !! पण ते लक्षात येत असही नाही!! तु कदाचित कोणाशी प्रेम करत ही असावीस पण तुला ते तेव्हाच कळेल जेव्हा तुला त्या व्यक्तीचं असणं आनंद देईन आणि त्याचा विरह अश्रू!! "  समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"समीर तु प्रेम करतोस कोणावर??"
समीर काहीच न बोलता निघून गेला. कित्येक वेळ सायली त्याच्या प्रेमाची व्याख्या आठवत होती. आनंद आणि अश्रू यातच प्रेम कसे असेल? याचा हिशोब ती करत होती. कदाचित समीरला काहीतरी बोलायचं असेन पण ते शब्द कुठेतरी विरले असतीन का असे तिला वाटत होते.
  समीर आता मित्रासोबत बाहेर आला होता. त्याच्या मनात सायली बद्दल अनेक विचार फिरत होते.
"समीर अरे कोणत्या विचारात आहेस?" समीरचा मित्र सचिन त्याला म्हणत होता.
"काही नाहीरे सचिन, सायली आज प्रेम म्हणजे काय विचारत होती मला !! पण तिला बोलता बोलता मीच शांत झालो !!"
"काय विचारलं तिने अस??" सचिन समीरला विचारू लागला.
"प्रेम करतोस कोणावर अस विचारत होती मला !!"
"समीर बहुतेक ती तूषारच्या प्रेमात आहे!! मध्ये मी तिला पाहिलं होत त्याच्या सोबत!! नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे समीर !! "
सचिनच्या या बोलण्याने समीर नक्कीच मनात कुठेतरी दुखावला होता. पण का ??  मनात कुठेतरी  सायली बद्दल असलेली प्रेमाची भावना समीरला शांत बसू देत न्हवती.
" ती कविता तिच्याकडे पाहूनच सुचली होती ना ?? " समीर मनातल्या मनात विचारत होता.पण तिचं तर प्रेम नाही आपल्यावर. मग सायली अस का विचारत होती मला? असे कित्येक विचार करत समीर घरी आला. नीट जेवला ही नाही.
सचिन ने सांगितल्या पासून समीरच वागणं सायली बद्दल पूर्ण बदलून गेलं होत. तो आता तिच्याशी थोड तुटकच बोलू लागला होता. आणि ही गोष्ट सायलीच्या ही लक्षात आली होती. तेव्हा
"समीर अरे कुठे आहेस ??" सायली समीरच्या समोर येत म्हणाली.
"आहे इथेच, कुठे जाणार दुसरीकडे??"
"भेटलाच नाहीस म्हणून विचारलं!! "
"रोज भेटाव अस काही आहे का ??"
"समीर तु असा का बोलतोयस ??"
"मग कस बोलायचं सांग मला !!!"
"काहीं झालंय का ?"  सायली समीरकडे पाहत होती.
"काहीं उरलेच नाही आता !!"समीर अगदी रागात म्हणाला.
    प्रेम आणि मी !! अस आईला म्हणनारा समीर सायलीच्या प्रेमात पडला होता. वरवर ते त्याला कळत न्हवते. पण त्याची वागणूक आता तेच सांगत होती. सायली  पुन्हा पुन्हा त्याला बोलतं होती. पण समीरच्या मनात काही वेगळच चाललं होत. सायली आणि तुषार यांच्यात खरंच काही आहे का ?? सचिन म्हणतोय ते खरं असेन का ?? की सचिन खोट बोलतोय.समीरला यातलं काहीच कळत न्हवत. पण त्याला मनातुन एवढं कळलं होत की सायलीवर त्याच मनापासून प्रेम होत. त्याला तो नाकारू शकत नाही हेही त्याला कळलं होती. थेट सायलीला विचारलं तर आणि अस काही नसेन तर तिचं मन दुखावले जाईन म्हणून सगळं काही समीर मनातच ठेवून होता. पण सचिनला विचारलं तर?? असा मनात विचार येताच समीर त्याला भेटायला निघाला . मनातल्या वादळास कुठेतरी निवारा शोधायला निघाला.

क्रमशः...

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...