मुख्य सामग्रीवर वगळा

सुर्यास्त (कथा भाग - १)

"काकु !! समीर कुठे आहे ?? सायली समीरच्या घरात येत म्हणाली.
"संध्याकाळची वेळ!!! म्हणजे समीर गच्चीवर असणार ना!! समीरची आई सायलीकडे पहात म्हणाली.
सायली काहीच न बोलता थेट गच्चीवर जाऊ लागली. समीर गच्चीवर काहीतरी लिहिण्यात मग्न होता. सुर्यास्त होताना पाहायला त्याला खूप आवडायचं. सायलीला समोर पाहताच त्याने त्याची वही बंद केली.
"काय लिहितोय समीर?? सायलीला अचानक पहाऊन समीरला काय बोलावं तेच कळेना.
"काही नाही ग जनरल लिहीत होतो!!  समीर स्वतःला सावरत म्हणाला.
"प्रेम पत्र लिहितोय की काय कोणाला?? सायली मिश्किल हसत म्हणाली.
"प्रेम पत्र आणि मी ?? शक्य आहे का ते ?? "
"बरं बरं ते जाऊदे !! तु रोज संध्याकाळी काय करतोस पण इथे??"
"तो दुरवराचा सूर्य बुडताना पाहायला खुप आवडत मला !! " समीर लालबुंद सूर्याकडे पहात म्हणाला.
"रोज??"
"हो रोज !! रोज नवीन वाटतो तो मला !! अगदी मला बोलतो तो सूर्य !! " समीर सायलीच्या डोळ्यात पहात म्हणाला.
"पण ते जाऊदे !! तु इथे काय करतीयेस??"
"अरे!! राहिलाच बघ !! अरे मी तुला पुस्तक द्यायला आले होते !! हे घे तुज पुस्तक!! "
"वाचलं तु पुस्तक हे ??"
"हो वाचलं , किती सुंदर आहे हे पुस्तक !! मला ते तुला द्यायचंय न्हवत पण म्हटलं तुला हवं असेन म्हणून आले !!"
"तुला अवडल असेन तर राहुदे पुस्तक तुझ्याकडेच, हाकेच्या अंतरावर तर असतेस वाटेनं तेव्हा घेईन मी तुझ्याकडुन!!!"
"खरंच!! "
"हो खरंच राहुदे.!! समीर तिच्याकडे हसत म्हणाला.
सुर्य आता पुर्ण बुडाला होता. अंधाराने स्वतःचा पसारा मांडायला सर्वात केली होती. त्या सुर्यास्ता कडे पहात समीर अचानक बोलला

"कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे

नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!

कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!" समीर कविता म्हणत सायली कडे पाहू लागला. कित्येक वेळ सायली फक्त त्याच्याकडे पाहताच होती.
"समीर किती सुंदर आहे !!! कोणी लिहिली आहे रे ??" सायली समीरला विचारू लागली.
"काही माहीत नाही कोणी लिहिली, पण मनातुन भावना बोलल्या एवढंच!"
" बरं चलं मी जाते !! आई वाट पहात असेन माझी!!  " सायली समीर पासून दुर जात म्हणाली.
कित्येक वेळ ते शब्द तिच्या मनात तसेच घोळत होते.
समीर जाणाऱ्या सायलीकडे कित्येक वेळ पहात होता. सुर्यास्त केव्हाच झाला होता. त्या वहीत काहीतरी लिहिलं होत पण काय हे सायलीला का सांगितलं न्हवत . काही कळत न्हवत. सायली समीरच्या शेजारीच राहायला होती. रोज भेटही होत होती कदाचित ती वही सगळं काही लिहून घेत होती.
"समीर , अरे काय त्या वहीत लिहीत असतोस सारखं आम्हाला ही कधी वाचायला दे !!" आई समीर कडे पाहत म्हणाली.
"आई तुला वाचून दाखवणार नाहीतर कोणाला ऐकतेस ??" समीर गच्चीवरून खाली येत म्हणाला.
"हो ऐकते!!" आई समीर समोर येत म्हणाली.

"पाठमोऱ्या तुला जाताना
थांबवावे वाटले मला
पण पुन्हा भेटण्याची ओढ मला
थांबवत होती तेव्हा

त्या वाटेवरून जाताना
पुन्हा वळावे वाटले होते मला
पण पुन्हा नव्या वळणावर
भेटायचे होते तुला

कधी मनातलं सारं
सांगायचं होतं तुला
पण पुन्हा नव्या किवेतेमधे
लिहायचं होत मला ...!!" समीर आईकडे पहात कविता म्हणाला.
"समीर प्रेमात वैगेरे नाहीस ना तू कोणाच्या ??"  आई गालातल्या गालात हसत म्हणाली.
"प्रेम आणि मी !! नाही ग आई !! " समीर घरातुन बाहेर जात म्हणाला.

क्रमशः

-योगेश खजानदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...