मुख्य सामग्रीवर वगळा

अंतर...!!(कथा भाग -५) (अंतिम भाग)

मनातल सगळ सांगायचं म्हणून योगेश प्रियाला दुसऱ्या दिवशी भेटायला निघाला. आज योगेश येईन तिला घेऊन जायला म्हणून प्रिया ही सकाळपासून आवरत होती.  क्षणाची गती थोडी कमी झाली होती अस तिला वाटत होत. दुपारच्या वेळी अचानक योगेश प्रियाच्या घरी आला.
"सकाळ पासुन वाट पाहतेय तुझी मी!!" प्रियाला मनातली ओढ लपवताच आली नाही.
"सॉरी यायला थोडा उशीरच झाला!"योगेश ही गमतीने म्हणाला.
"आई मी येते!!"
"योगेशला घरात तरी येऊ दे!!"प्रियाशी आई एकदम म्हणाली.
"नको काकू!! असही बाहेरच जायचं होत आम्हाला!!"
दोघे आज कित्येक वर्षांनी एकत्र होते. प्रियाचा तो योगेश पासुन झालेला दुरावा आज स्पष्ट दिसत होता. कित्येक वर्षांच अंतर हळूहळू कमी होत होते. योगेश प्रियाला एका सुंदर समुद्र किनारी घेऊन गेला. त्या लाटांचा आवाज दोघान मधील शांतता भंग करत होती.
"तुझ्या मनातली ओढ, मला भेटण्याची का बरं जाणवते!! योगेशने प्रियाला विचारलं.
तो आता बोलायला होता मनातल सगळ सांगायला होता.
"तुषारने एवढ मनापासुन प्रेम करूनही माझ्यासाठी तुझ्या मनात जागा का आहे ?" योगेश भावनेच्या भरात बोलत होता.
"कारण तुझ्या अबोल मनानेही तेवढच प्रेम केलं आहे माझ्यावर!! तुला आठवत तु मला एकदा तुझी काविता ऐकवली होतीस!!
अबोल मनातले माझ्या
शब्द किती बोलके
सांगू कसे तुला मी
ओठांवर का विरते !!!
तेव्हाच तुझ माझ्यावरचं प्रेम मला कळलं होत!!
"पण तूही कधी मला तुझ प्रेम नाही सांगितलस !!" योगेश प्रियाला म्हणाला.
"कारण माझेही शब्द ओठांवरच विरून जायचे!!" प्रिया योगेशच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
"तूषारला कधी विसरून जाशील??"
"कधीच नाही!! त्यानेच तर प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितले मला!!"एखाद्यावर जीवापाड प्रेम करायचं, इतकं की आपला शेवटचा श्वास त्याला द्यायचा!!" प्रिया अश्रू पुसत बोलत होती.
"खरंच मी तुषारला ओळखूच शकलो नाही!! माझ्या मनाची ती अवस्था मला सांगता ही येत नाही! तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम दिसत असतानाही तु तुषार सोबत का गेलीस याने मी पुरता हरवून गेलो!! तुझा तिरस्कार करावा म्हटल तर तेही जमल नाही! त्या दिवशी तु अचानक coffee shop मध्ये मला विचारलस आणि मी गोंधळून गेलो!! त्या लाटांचा आवाज आता विरून गेला होता योगेश प्रियाला बोलत होता. तिही आता सगळं मनापासुन ऐक होती.
"पण आता नाही!! प्रिया मला तुझी साथ हवी आहे!! अगदी कायमची!!  हे अंतर आपल्यातलं मला संपवून टाकायचं !!! तु ही अबोल नसाविस आणि मीही अबोल न रहावा !! तुझ्या प्रत्येक क्षणावर मला प्रेम करायचं आहे !! तुषारने तुला प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितलं आणि मला तू !! योगेश प्रियाचा हात हातात घेऊन म्हणत होता. प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते.
"माझ्या डोळ्यातली ओढ तुला कधीच कळली नाही! तरीही मी तुझी वाट पहायचे!! ती या क्षणासाठीच !!की कधीतरी तू येशील आणि मला माझी साथ मागशील!! पण आज तूषारच्या आठवणीच घरचं आता मला छान वाटतेय ! " प्रिया योगेशकडे पाहतच न्हवती.
"तुषारला विसरून जा अस मी कधीचं म्हणार नाही तुला  !! "
"पण पुन्हा अबोल होऊन निघून गेलास तर मी क्षणभर ही जगू नाही शकणार!!"
"आता अबोल रहावस वाटत नाही प्रिया !! एक एक क्षण तुझ्याचसाठी द्यावा अस मन बोलतेय !! देशील माझी साथ कायमची ??? योगेश अगदी शांत विचारत होता.
कित्येक वेळ प्रिया काहीच बोली नाही. तो समुद्र किनारा आता सांजवेळी गुलाबी किरणांनी नाहून निघाला होता!! मंद वारा जणु पुन्हा पुन्हा घिरट्या घालत होता जणु दोघांचं बोलणं चोरून ऐकत होता.
"मला कधीच सोडून नाहीस ना जाणार योगेश?? मी अबोल झाले तर माझी समजूत काढशील ना?? तुझ्या आणि माझ्या मधील या अंतराचा शेवट त्या सूर्यास्तात जणु होतोय अस मला वाटतं आहे!!  प्रिया मंद हसत योगेशकडे पाहत होती आयुष्यभराची साथ द्यायचं वचन जणु देत होती.
"या प्रत्येक क्षणावर तुझाच नाव असेन आता प्रिया!!  तुझा हात कधीच मी सोडणार नाही !! योगेश तिच्याकडे पाहत म्हणाला.
कित्येक वेळ प्रिया योगेशच्या मिठीत तशीच बसून राहिली. तिकडे तो सूर्यास्त झाला , जणु दोन जीवांच मनाच अंतर अस्तास गेलं. अगदी कायमचं. जणु तो समुद्र किनारा त्याच्याकडे पाहून म्हणत होता..

"ओढ मनाची या
खूप काही बोलते
कधी डोळ्यातून दिसते
तर कधी शब्दातून बोलते

वाट पाहून त्या क्षणाची
खूप काही सांगते
कधी अश्रून मधुन वाहते
तर कधी ओठांवर विरून जाते

न राहवून कधी
बेभान जेव्हा होते
मनातले जणु तेव्हाच
अंतर ही ते मिटते!!

ओढ मनाची या
दोन जीवास बोलते !!! "

ती सांजवेळ ही जणु दोघांसाठी क्षणभर थांबली होती.....

*समाप्त*

-योगेश खजानदार







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...