मनातल्या तुला लिहिताना
जणु शब्द हे मझ बोलतात
कधी स्वतः कागदावर येतात
तर कधी तुला पाहुन सुचतात
न राहुन स्वतःस शोधताना
तुझ्या मध्येच सामावतात
कधी तुझे नाव लिहितात
तर कधी कवितेत मांडतात
का असे वेडे नयन हे
शब्दा सवे हरवतात
कधी मलाच न भेटतात
तर कधी तुलाच न शोधतात
सांग सखे काय करु
तुलाच न सांगतात
कधी वही मध्ये लिहितात
तर कधी ह्रदयात कोरतात
मनातल्या तुला लिहिताना
जणु भाव हे मझ बोलतात
कधी क्षणात तुला पाहतात
तर कधी तुझी साथ मागतात
-योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply