आयुष्याची संध्याकाळ म्हणजेच म्हातारपण. ते जर आपल्या लोकांन सोबत असेल तर या संध्याकाळचा एकांत प्रखर जाणवत नाही. आपली मुल आपले नातु जवळ असावेत एवढच वाटत रहातं. आपली पत्नी जी आपल्या सोबत म्हातरपणात ही असावी असे वाटते. अखेर सगळं झाल्यानंतर आपल्याच लोकांनचा सहवास असावा. आधार देणारा आपला मुलगा , छोट्या छोट्या नातवंडाना राजा राणीच्या गोष्टी सांगन हीच खरी आयुष्याची संध्याकाळ असते .. असं प्रत्येक आयुष्य सरलेल्या माणसास वाटत राहतं.. म्हणुनच ..
एक कविता ...
'आपल्यास' ..
"या निर्जीव काठीचा आधार
मला आता आहेच
पण तुझ्या हातांचा आधार असावा
एवढच वाटतं मला
खुप खुप एकांतात असताना
आठवणींचा खजिना भेटतोच
पण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा
तेच हवंसं वाटतं मला
कधी विसरुन जाताना मला
ते वय आठवण करुन देतंच
पण त्या लहान पावलां सोबत
पुन्हा खेळावस वाटतं मला
राजा राणीच्या गोष्टींत हरवुन जाताना
मन थोडं मागे जातंच
पण ते ऐकणारी ती छोटीशी प्रजा
खुप पहावीशी वाटते मला
हे वयंच असतं ना असं
सगळं अंधुक होतं जातंच
पण पुन्हा ते नव्याने समोर दाखवणारं
आपलंस कोणी असावं वाटत मला
या श्वासांचा जप अखेर
कधी ना कधी संपेलच
पण शेवटच्या श्वावसात सोबत असणारं
माझं घर जवळ असावं वाटत मला..!!"
- योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply