'तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळजीच होतं. मी वेडाचं आहे जो तुझ्या त्या अबोल शब्दांस , अनोळखी नजरेस ओळखू शकलो नाही!!' मंदार प्रियाच्या नजरेत नजर रोखुन सगळं बोलतं होता. प्रिया फक्त त्याच्याकडे पहातं होती. तिची ती शांतता त्याला नकोशी वाटतं होती.
'सांग ना मला प्रिया!! हवं तरं भांड माझ्याशी, पण हा अबोला नको!! ती अनोळखी नजर तुझी, मला पाहुन न पाहिल्या सारखे करणे खरंच असह्य होतंय मला!! त्याच्या बोलण्यातुन त्याच तिच्यावरच प्रेम शब्दांतुन जाणवंत होतं. त्या भेटीत त्याला खुप काही बोलायचंय तिच्या मनातल्या रागास कुठेतरी संपवायचंय हे तिला कळत होतं. मनात मात्र प्रिया खुप काही बोलतं होती आपल्या कित्येक भावना ती सांगत होती तिच्या मनातल्या भिंती त्या सर्व ऐकत होत्या पण मंदारच्या मनात त्या ऐकु जातं नव्हत्या.
खुप काही सांगायचय रे मला पण कस सांगु ज्यावेळी खरंच मला तुझी गरज होती त्यावेळी तु कुठे होतास हे कस मी सांगु. नातं हे अस नसतं रे तुझ्या मनात येईल तेव्हा तु चिडायचं वाटेल तेव्हा निघून जायचं आणि पुन्हा माझी आठवण येताच मला मनवायचं असं किती रे दिवस हे चालणार. मनात सार प्रिया हे बोलत होती पण ओठांवर ते काहीच येऊ देतं नव्हती. कारण तिला मंदारला दुखवायचं नव्हतं.
मंदारची चिडचीड पाहुन तिलाही दुखः वाटतं होतं पण हळव्या या मनास तिला कुठेतरी कठोर करायचं होतं. मंदारच हे वागणं आता असह्य झालं होतं. प्रिया त्याच्या प्रेमासाठी त्याला काहीच बोलतं नव्हती. पण अखेर तिने ही मंदारला मनातल सगळं सांगितलं. तिचा तो अबोला संपताचं ती बोलली.
'मंदार माझं न बोलणं, तुझ्याकडे पाहुनही न पाहिल्या सारखे करणे यांचा तुला त्रास होतो ना? मग अस तुही माझ्याशी वागताना माझ्या मनाचा विचार केलायस कधी? छोट्या भांडणातही तु माझ्याशी कित्येक दिवस बोललाच नाहीस ज्यावेळी आलास त्यावेळी तुला कोणीतरी बोललं म्हणुन तुला माझी आठवण आली ! खरं ना?? म्हणजे माझं स्थान तुझ्या आयुष्यात कुठे आहे हेच मला कळत नाहीये. तुला वाटेल त्यावेळी तु नातं जोडतोस आणि पुन्हा गरज संपताच ते तोडुन टाकतोस त्यावेळी नात्यांची किंमत तुला कधी कळतच नाही रे.!!
'प्रिया, खरंच माझं चुकलं मला माफ करं !!' मंदारच्या डोळ्यात पाणी आले होते.
'नाही मंदार प्रत्येक वेळी सगळं झाल्यावर माफी मागण्यात काय अर्थ असतो सांग ना? कित्येक वेळा हा मनास दुखवायचा आणि पुन्हा काही झालेच नाही असे म्हणुन माफी मागण्याचा खेळ चालणार? मला आता याविषयी काहीच बोलायच नाही आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही असं मी ठरवलंय! !
प्रियाच्या या निर्णयाचा मंदारला चांगलाच धक्का बसला त्याला काय बोलावे तेच कळेना. माफी तरी काय म्हणुन मागावी. आणि त्याचा आता काही अर्थ ही नव्हता. अखेर प्रिया जाण्यास निघाली मंदारने खुप तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण वेळ आता निघुन गेली होती. होतं त्यावेळी नातं जपता आलं नाही आणि आता ते दुर जाताना मंदारला त्याचा त्रास होत होता.
'माझं खरंच चुकलं मला करं !! मंदारचे हे शब्द प्रियाच्या मनापर्यंत पोहचलेच नाहीत आणि पोहचतील ही कसे मंदारनेच ते मन दुखाच्या वेदनेने घायाळ केले होते तिथे त्याचे शब्द ऐकायलाही ते मन आता तयार नव्हतं पुन्हा नव्याने सुरू करण्यास तिचा मन आता तयार नव्हते.
कित्येक वेळ मंदार ती निघुन गेल्यावर तिथेच बसुन होता. हरवलेल्या नात्यास कुठेतरी शोधत होता. 'प्रिया, नकोस जाऊ तु मला सोडुन!! आठवणींना तो सांगत होता. आणि हरवुन गेलेल्या पाखरास उगाच एकटाच शोधत होता.
-योगेश खजानदार
"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply