मुख्य सामग्रीवर वगळा

Valentines day special...

माझ्या कविता ...
----------------------------------

7 Feb ....

गुलाबाची पाकळी... !!

गुलाबाची ती पाकळी
मला आजही बोलते
तुझ्या सवे घालवलेले
क्षण पुन्हा शोधते

शब्दांच्या या वहीत
लिहून काहीतरी ठेवते
सुकुन गेली तरी पुन्हा
सुगंध आजही देते

मी आहे तु आहेस
ती आठवण आजही असते
वहीतल्या या शब्दांना
चोरुन गोष्ट ती सांगते

गुलाबाची पाकळीच ती
व्यक्त काय ती करते
तुझ्या मनातील त्या शब्दांना
वाट मोकळी करते

हसते खुदकन केव्हा तरी
हळुच काय ती बोलते
तुझ्या ओठांवरचे हसु जणु
माझ्या ओठांवरती पहाते

गुलाबाची ती पाकळी
मला आजही खुप बोलते .. !!!
-योगेश खजानदार

---------------------------------

8 Feb..

प्रेम ते

नभातील चंद्रास आज
त्या चांदणीची साथ आहे
तुझ्या सवे मी असताना
मंद प्रकाशाची साथ आहे

हात तुझा हातात घेऊन
रात्र ती पहात आहे
चांदणी ती मनातले जणु
चंद्रास आज सांगत आहे

कुठे आज या रात्रीत
बेभान ती झाली आहे
मनातल्या भावनांस
चौफेर उधळीत आहे

प्रेम हे ह्रदयातले जणु
चंद्रास खुलवीत आहे
चांदण्याची कुजबुज ही
रात्रीस बोलत आहे

चांदणी ही चंद्रास आज
प्रेम व्यक्त करत आहे
ती रात्र ही जणु पुन्हा
हरवुन जात आहे
-योगेश खजानदार

------------------------------

9Feb..

गोडवा

"तुझ नी माझं नातं हे
अगदी गोड असावं
तुझ्याकडे पहातचं मी
मला पूर्णत्व मिळावं

कधी हसुन रहावं
तर कधी मनमोकळ बोलावं
अश्रुना ही इथे येण्यास
आनंदाच कारण असावं

कधी वाट पहाताना माझी
तु स्वतःस ही विसरुन जावं
तुझ्या प्रेमाच्या गोडव्यात
सार काही मधुर व्हावं

तुझ्या खोट्या रागास ही
मी उगाच का पहावं
तुला मनवण्यास तेव्हा मी
तुला काय बरे द्यावं??

तुही तेव्हा माझ्याकडुन
हक्काने आवडीचं मागावं
वाटते त्या गोडव्याने ही आता
मनामध्ये कायम रेंगाळावं..!!"
- योगेश खजानदार

----------------------------------

10 Feb..

अबोल मी

"कधी कधी वाटतं
अबोल होऊन रहावं
तुझ्याकडे पहात नुसत
तुझ बोलन ऐकावं
पापण्यांची उघडझाप न करता
एकटक तुझ्याकडे पहावं
आणि तुझ्या बरोबर सतत राहुन
फक्त तुझाच होऊन जावं

कधी कधी वाटतं
तुझं आवडीचं गाणं लागावं
तुही त्या सोबत मनसोक्त म्हणावं
माझ्या जवळ येऊन
उगाच मला मिठीत घ्यावं
त्या गाण्यात सुर मिसळून
मलाच घेऊन नाचावं

कधी कधी वाटतं
सगळं काही विसरु जावं
तुझ्या सवे असताना
तुझ मन वाचावं
मनातल्या कोपर्‍यात कुठेतरी
स्वतःलाच कोरावं
आणि कोरलेलं ते नाव माझं
कायमच तिथेच रहावं...!!!"

-योगेश खजानदार

------------------------------

11 Feb..

"वचन.. !!"

वचन दिलं होतं नजरेस
फक्त तुलाच साठवण्याचं
तुझ्या सवे आठवणींचा
पुन्हा ती स्वप्ने पहाण्याच
मिटलेल्या डोळ्यातही
ह्रदयात तुला ठेवण्याचं
तुझ्या आठवणीत
अश्रुना त्या सावरण्याचं

वचनं दिलं होतं त्या श्वासासही
फक्त तुझ्यासाठी जगायचं
प्रत्येक क्षणात जणु
तुला नव्याने प्रेम करायचं
तु नसताना ह्रदयात या
श्वासात तुला जपायचं
प्रत्येक श्वासावर फक्त
तुझचं नावं द्यायचं

वचन दिलं होतं तुलाही मी
तुझा हात कधी न सोडायचं
तुझ्या सोबत चालताना
शेवट पर्यंत चालायचं
येईल कोणतं ही संकट
तुझ्या सोबत रहायचं
नजरेत तुझ्या स्वतःस पहातं
श्वास तुझा व्हायचं

वचन दिलं होतं मी ... !!!
-योगेश खजानदार

---------------------------

12 Feb..

तुझ्या मिठीत

"ती तुझी मिठी मला
खुप काही बोलायची
मी आनंदात असताना
जवळ मला घ्यायची
कधी खुप दुर असताना
ओढ मला लावायची
आणि जवळ येताच
अश्रुनांही विसरुन जायची

ती तुझी मिठी मला
खुप काही सांगायची
कधी स्वतःला हरवुन
माझीच होऊन जायची
त्या दोन हाताच्या बंधनात
सार जग सामावुन जायची
आणि माझ्या स्वप्नांना
मनातल्या गोष्टी सांगायची

ती तुझी मिठी मला
खुप समजुन घ्यायची
माझ्या ओठांवरचे शब्द
अचुक टिपायची
रुसलेल्या मला कधी
चटकन मनवायची
आणि जवळ तु येताच
तुझीच होऊन जायची.. !!"

-योगेश खजानदार

---------------------------

13 Feb..

'मनातील..!'

तो ओठाचा स्पर्श अजुनही
जाणवतो मला माथ्यावर
तुझ्या भावना अबोल होऊन
बोलल्या त्या मनावर
माझीच तु आणि तुझाच मी
एक जाणीव होती नात्यावर
विसरुन जाईल जग हे सारे
जादु कसली ही क्षणांवर

तो ओठाचा स्पर्श अजुनही
जाणवतो मला हातावर
तुझ्या सवे चालताना
सोबत हवी त्या वाटांवर
कधी नसेल एकटाच मी
जाणीव करते मनावर
देईन साध तुझी अखेरपर्यंत
सांगतो तो स्पर्श ह्रदयावर

तो ओठाचा स्पर्श अजुनही
जाणवतो मला गालावर
रुसलेल्या मला तो जणु
बोलतो या ह्रदयावर
क्षणात जातो राग कुठे
दिसतो ना मनावर
तो ओठाचा स्पर्श तुझ्या
हसु उमटवतो माझ्या ओठावर.. !!!

-योगेश खजानदार

--------------------------------

14 Feb ..

भावना....

कधी हळुवार यावी
कधी वादळा सारखी यावी
प्रेमाची ही लाट आता
सतत मनात का असावी?

तु सोबत यावी
ऐवढीच ओढ लागावी
मनातल्या भावनांची जणु
नाव किनारी का जावी?

समोर तु असावी
सतत ह्रदयात रहावी
चेहरा तुझा पहाण्यास
नजरेने धडपड का करावी?

साथ तुझी अशी असावी
भेट तुझी रोज व्हावी
वाट तुझी चालताना
वेळ अनावर का व्हावी?

मला माझी शुद्ध नसावी
तुझीच आठवण रहावी
स्वतःस ही शोधताना
तुच मझ का सापडावी?

हे प्रेम की भावना असावी
तुझ्यासवे आयुष्यभर रहावी
सुटताच येऊ नये अशा बंधनात
मला कायमची का अडकावी?
-योगेश खजानदार

----------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...