विरहं...


ती रात्र खुप काही सांगत होती. खिडकीतून बाहेर बघत मानसी एकटक लुकलुकत्या तार्‍यांकडे बघत होती. मनात विचारांचा नुसता गोंधळ झाला होता. तेवढ्यात किरण खोलीत येत मानसीचे ते रुप न्याहाळु लागला. तिच्या जवळ जात तो तसाच उभा राहिला. त्याच्याकडे न पहाताच ती त्याला म्हणु लागली
'किरण या आकाशतल्या चांदण्याच खरंच मला कौतुक वाटतं!!'
'का बरं?' किरण ही त्या चांदण्याकडे पाहु लागला.
'बघ ना इतक्या दुर असुनही कसे ते आपलेसे वाटतात. यामध्ये कुठतरी आपणही हरवलो आहोत याची जाणीव ते करतात. पण तरीही कधी ते परके असे वाटतंच नाहीत. प्रत्येक चांदणी आपल्याशी काहीतरी बोलतेय असं वाटतं.' मानसी मनातल सगळं सांगु लागली.
'मानसी काय झालंय सांगशील का?'
'काही नाही रे, असच वाटल म्हणुन म्हटले,  पण बघ ना नात्यांच ही असच असत ना? म्हणजे प्रत्येक नातं हे एक चांदणी सारखं असतं, आपल्या आयुष्यात ते सतत लुकलुकत असतं , कधी दिसेनास होतात तर कधी लख्ख प्रकाश पाडतात अगदी पौर्णिमेच्या चांदण्यान सारखं. आणि कधी अचानक नकळत तुटुनही जातात.'
मानसी डोळ्यातल पाणी टिपत म्हणतं होती.
'पार्थ ची आठवण येतेय?'
'नाही रे , पण आजही तो आपल्यात आहे असच वाटतं,  कोणत्याही क्षणी तो आई म्हणतं माझ्याकडे येईन आणि मला बिलगुन त्या डब्यातला खाऊ दे म्हणुन हट्ट करेन असं वाटतं.'
'मानसी आता पार्थला विसरायला हवं!'
किरणच्या या वाक्या सरशी मानसी पुर्ण कोसळली, तिला काय बोलावं तेच कळेना. किरणच्या कुशीत जाऊन ती कित्येक वेळ आसवे गाळत होती. त्या चांदण्यात आपल्या बाळाला शोधत होती. पण एक चांदणी केव्हाच तुटुन गेली होती अगदी कायमची.
'किरण आपला पार्थ कधीच कारे येणार नाही?'
'मानसी आपला पार्थ आपल्या जवळच आहे, आपल्या मनात , आपल्या आठवणीत अगदी कायमचा.
मानसी आता स्वतःला सावरते झाली. किरणच्या खांद्यावर डोक ठेवुन कित्येक वेळ ती आकाशातल्या चांदण्या पहात राहिली. मनात पार्थला साठवत राहिली अगदी पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे लख्ख.

कुठेतरी आजही
तुझी आठवण कायम आहे
त्या चांदण्या मध्ये मी तुला
का उगाच शोधते आहे
अश्रुचा हा सागर जणु
मला का आज बोलतो आहे
आठवणींच्या लाटां मध्ये
तु कुठे हरवला आहे
येशील का रे आज पुन्हा
ही ओढ मझ अनावर आहे
तुझ्यासाठी मी पुन्हा
तिथेच येऊन उभी आहे
तुटलेला हा तारा जणु
क्षणभर का थांबला आहे
माझी आठवणही त्याला
कदाचित येत आहे
-योगेश खजानदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...