कदाचित त्या वाटा ही
तुझीच आठवण काढतात
तुझ्या सवे चाललेल्या
क्षणास शोधत बसतात
पाऊलखुणा त्या मातीतून
भुतकाळाची साक्ष देतात
एकट्या या मुसाफिरास
तुझीच साथ मागतात
तु पुन्हा फिरुन यावंस
हीच वाट पहातात
आणि थांबलेल्या मला
पुन्हा तुझीच ओढ लावतात
येईल वारा ऊन नी पाऊस
कसली चिंता करतात
तुझ्या सवे हा जीवन प्रवास
सगळं काही सहन करतात
त्या वाटा आता पुन्हा
मला तुझ्याच जवळ आणतात
एकट्या या मुसाफिरास
पुन्हा साथ तुझीच मागतात
-योगेश खजानदार
"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Leave a Reply