मुख्य सामग्रीवर वगळा

शब्द की भावना

दादा !! रामा ने हाक मारली.
कोण आहे रे!!
दादा !! तुम्हाला भेटायला कोणी तरी आलय बाहेर?!!
बर थांब!! आलो मी !!बसा म्हणं !!
कोण आलं आहे. पहायला सुहास बाहेर गेला. समोर एक स्त्री बसली होती. सुहास तिच्याकडे पहाताच थोडा गोंधळुन गेला. ती शितल होती. कित्येक वर्षां पुर्वीच प्रेम पुन्हा त्याच्या समोर होतं.
शितल !! किती दिवसांनी भेटतेयस !
यावं लागलं रे मला!! तुझ्या शब्दांनी खेचुन आणलं मला आज! सुहास ने लिहिलेलं पुस्तक तिच्या हातात होतं.
तु वाचलंस पुस्तक! !
हो!! वाचलं मी!! तुझ माझ्यावर इतक प्रेम होतं हे मला कधी कळलंच नाही! !
सुहासला काय बोलावं तेच कळेना. शितल अशी आपल्याला भेटायला येईल याचा त्याने कधी विचारही केला नव्हता
' तु अशीच पुन्हा परतावी
मी किती तुझी वाट पाहावी
तुझं कळेल हे प्रेम किती
परतुन ती सांज यावी'
किती गोड लिहिलंयस हे तु!! शितलने सुहासच्या पुस्तकातील काही ओळी म्हणुन दाखवल्या.
' तु निघुन गेल्यावर मला काहीच कळेना! तुझ्यावर रागावु की स्वतःवर  तेच कळेना! शेवटी मनातल कुठेतरी मोकळं करायचं होतं!! या शब्दांनी आधार दिला!!' सुहास डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला.
' सगळं मनासारखं होतं अस नाही रे! ' शितलंही आता मनातील दुख डोळ्यातुन टिपत होती!!
' आपण का वेगळे झालो याच पुन्हा मला बोलायचं नाहीये! !' पण सुहास मी ही खुप वाट पाहिली रे तुझी!!'
शितल मी बंधनात अडकलो होतो!!  ज्या शब्दांनी आज माझ प्रेम पुन्हा मला भेटायला आणलं त्याच शब्दांनी त्यावेळी माझा घात केला!! सुहास शितलच्या हातातील पुस्तकाकडे बघत बोलत होता. ' बाकी, आज माझ्या प्रेमानेच माझ्या पुस्तकाची स्तुती केली !! छान वाटलं.!!
'पण असं समजु नकोस हं !! मी भेटायला आले म्हणुन माझा रुसवा जाईल! जवळं होतास त्यावेळी कधी ऐकवली नाहीस पण आता तुला माझ्यासाठी कविता ऐकुन दाखवावी लागेन बरं!!'
शितलं गोड हसतं म्हणाली.
'या पुस्तकातीलच एक ऐकवु??' सुहास तिच्याकडचे पुस्तक हातात घेत म्हणाला.
'हो ऐकवं ना!!'

पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे
तु समोर असताना
व्यक्त व्हावे मन जसे

ती सांज तो वारा
पुन्हा ती वाट दिसे
ते नभ ही पाहता
चांदणी ती एकाकी असे

आठवणीत शोधताना
तु आसवात दिसे
चंद्र हा हरवला
मनी का सल असे

शब्दांत तुझ पहाताना
एक भास का दिसे
तु पुन्हा भेटावीस
मन हे अधीर दिसे

पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे!!! .. सुहास शितलकडे बघुन कविता म्हणाला.
व्वा खुप छान! सुहास !! खरंच आज मला खुप बरं वाटलं तुला भेटुन!! मनातल सगळं बोलुन !!  शितलं डोळ्यातील अश्रू टीपत म्हणाली.
मला ही बरं वाटलं तु मला भेटायला आलीस.!! आपलं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते तसंच राहिलं!!  क्षणांनी थोडी धुळ केली तर या पुस्तकाने साफ करायची!! आपलं प्रेम नेहमी चिरतरुण राहिलं!! सुहास शितल कडे पाहुन गालातल्या गालात हसला. शितलाही सुहासचं नवलं वाटलं. काळाने जरी वेगळं केल तरी सुहास शब्दांनी, मनाने तिच्यावर आजही तसाच प्रेम करत होता.
'पुस्तकाच नावं बाकी मस्त आहे!!' .."शब्द की भावना!" शितल पुस्तकाकडे बघत होती.
खुप वेळ झालाय हे शितलंला लक्षातच आलं नाही. घड्याळात पहात ती म्हणाली..  बर...  येते मी ! पुन्हा भेटायला येईल नक्की !! काळजी घे!  एवढं बोलुन शितल निघुन गेली. सुहास तिला जाताना नुसता पाहत होता. ओठांवर एक गोठ हसु होतं पुस्तकात शब्द होते आणि मनात भावना ..






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...