भाग ३ || डिनर || सकाळी ऑफीसला जायची वेळ होताच. श्याम मेन डोअर बेल वाजवतो श्रीधर धावतच दरवाजा उघडतो. समोर पहातो तर श्याम बरोबर अजून कोणीतरी स्त्री होती. श्रीधर तिच्याकडे पाहतो. पुन्हा श्यामकडे पाहत म्हणतो. "किती उशीर रे !! आणि ही कोण??" "ही बायको माझी !! काल ताईसाहेब आल्या ना !! म्हणून आजपासून आली. " "आजपासून म्हणजे ??" "अहो कामाला !!" "आता हे कधी ठरलं ??" "जगतापना माहीत होत !! त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला?? दोन दिवस तुम्ही एकटेच होतात म्हणून मी एकटाच येत होतो !! " "तू ये आत !! तुला सांगतो !! सगळं लपवून ठेवतो माझ्यापासून !" श्रीधर श्यामकडे पाहत म्हणाला. "आता काय लपवलं मी ??" "तू जा हा आत !!" श्यामच्या बायकोकडे पहात श्रीधर म्हणाला. ती आत निघून जाताच. श्रीधर श्यामला म्हणाला. "माझी बायको इथे आली आहे हे का सांगितलं नाहीस मला ??" "ते होय !! ते त्यांचं काहीतरी प्राइज होत ना म्हणून !!" "बरं !! ठीक आहे !!" श्रीधर श्यामकडे पाहत आत निघून गेला. श्यामची बायको हळूच किचन...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!