भाग ११ दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात, "कोण ??" "नमस्कार काका , मी सदाशिव , समीर दादा आहेत का ?? मी गाडी घेऊन आलोय!!" "हो आहेत या !! पुण्याला जाण्यासाठीच एवढी तयारी चालू आहे !! बसा ईथे !! एक तासाभरात निघुयात आपण !! " "ठीक आहे काक !! " सदाशिव शेजारीच ठेवलेल्या खुर्चीवर बसत म्हणाला. घरातली सगळी आवरा आवर झाल्यानंतर समीर काही राहील तर नाहीना पाहायला खोलीत आला, शीतल तिथे आधीच आवरत होती. समीरला पाहून ती थोडी गोंधळली, अचानक आपल्या जागेवर बसून राहिली. ती काहीतरी लपवते...
कथा, कविता, लेख, चारोळ्या आणि बरंच काही !!