मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पैसा बोले!! पैसा चाले!! || Paisa Kavita ||

श्रीमंताची जात पैसा, गरिबाला जात काय ?? विचार थोड स्वतःस तू, इथे तुझं अस्तित्व काय ?? पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !! श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !! धाव तू , थांब तू , पण जायचं तुला कुठे हाय ?? श्रीमंताची शिवी गोड, गरीबाची मारकी गाय !! सांगू नकोस कोणास काही, सगळं इथं गुपित हाय!! जात , पात सगळं खोटं, पैसा हीच जात हाय !! स्वप्न अशी पाहू नको , जिथे तुला जायचं न्हाय !! श्रीमंताच्या गावी परका, गरिबीत जागा न्हाय !! फिरून फिरून यावं तिथंच, शोध काही संपणार न्हाय !! दोन जगात तुला कधी , अस्तित्व तुझं भेटणार न्हाय !! विचार एवढा करून शेवटी , हाती उत्तर मिळेल काय ?? पैश्याच्या या दुनियेत आज , माणूस नक्की कुठे हाय ?? ✍️ योगेश

आगमन गणरायाचे || गणपती बाप्पा मोरया ||

बुद्धीची देवता म्हणून ओळख असावी अश्या गणरायाचे आज आगमन झाले. वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो त्या वक्रतुंडांचे आज आगमन झाले. आजपासून पुढचे दहा बारा दिवस या मंगलमूर्तिची मनोभावे सेवा करावी, आणि त्या वरदविनायक विघ्नेश्वराच्या आगमनाने घर आनंदी झाले. सगळीकडे नुसता आनंद आणि प्रत्येकाला त्या विनायकाला घरी आणण्याची घाई. आणि त्या गणराया प्रती असलेली भक्तांची ओढ ही वेगळी सांगावी लागतं नाही.  आज सकाळपासून घरात नुसती लगबग चालू होती. मोदक, वळीव लाडू, अनारसे, बेसनाचे लाडू, करंज्या अश्या कित्येक वक्रतुण्डाच्या आवडीचे पदार्थ करण्याची तयारी चालू होती. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची हीच खरी ओळख होती.  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करून समाजात यामधून एकी, बंधुत्व आणि आपुलकीची भावना निर्माण केली. आणि हीच ओळख या गणेशोत्सवाची झाली. मंडप, उंच उंच मुर्त्या, स्पर्धा, हलती देखावे आणि अशा कित्येक स्वरूपात या उत्सवाचे आयोजन होऊ लागले आणि यामागे एकच भावना, आणि ती म्हणजे त्या गणरायाची मनोभावे प्रार्थना. या प्रार्थनेत पुढचे दहा बारा दिवस कसे आनंदात जातात कळतही नाही. सकाळ...

असे कसे हे || Poem || Ase Kase He ||

मनात आहे !! पण ओठांवर येत नाही !! सारंच काही !! सांगता येत नाही !! तुला पाहिल्या शिवाय!! करमत ही नाही !! तुला ते कळू नये!! हे लपवता ही येत नाही !! आठवांचा पाऊस आता!! थांबत ही नाही !! चिंब त्यात भिजावे !! मन काही ऐकत नाही !! वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !! श्वास घ्यावा नुसता !! पण हे जगणे नाही !! कधी तुझा भास !! मनास कळतं नाही !! मनातले तुझे चित्र !! आजही पूर्ण होत नाही !! वेड्या मनाचे तुला !! शोधणे थांबत नाही !! शोधूनही न सापडावी !! ती तू मला भेटत नाही !! असे कसे मनाचे !! कोडे हे सुटत नाही !! मनातले हे भाव !! ओठांवर येत नाही!! ✍️ योगेश *ALL RIGHTS RESERVED*

स्वातंत्र्य दिनी व्हावे चिंतन मनन || Independence Day ||

 दरवर्षी स्वातंत्र्य दिन येतो आणि जातो. आपण विविध प्रकारे तो साजराही करतो, आणि तो केलाच पाहिजे. व्हॉट्सअँप , फेसबुक किंवा अनेक ठिकाणी राष्ट्रभक्तीपर स्टेटस ठेवून आपण आपल्या मनातली भावना व्यक्त करतो, आणि असे पाहता पाहता दरवर्षी हा स्वतंत्र दिवस येतो आणि जातो. या सर्वांमध्ये आपण विसरून जातो ती एक गोष्ट, ज्याचा कोणीही कधी विचार करत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे राष्ट्राप्रती चिंतन आणि मनन. आता तुम्ही म्हणाल चिंतन मनन म्हणजे तरी काय ?? तर आपल्या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून आपणच घेतलेला एक छोटासा आढावा. आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झालेली संस्थान भारतात विलीन झाली, आणि घडला तो आजचा भारत. त्यानंतर कालचा तो भारत आज कुठे आहे? याबद्दल केलेले आपलेच विचार आपल्याला या देशाप्रती अजुन सखोल विचार करायला लावणारी आहेत.  तुम्ही म्हणाल हे काम तर सरकारचं आहे, पण ही भावनाच मुळात चुकीची आहे, कारण देशाप्रती विचार, चिंतन मनन करण्याची गरज त्या प्रत्येक नागरिकाला आहे जो या देशाचा सुज्ञ नागरिक आहे. कोणत्याही देशाचा इतिहास हा त्या देशातील नागरिक लिहितात, तसेच भविष्यही हेच नागरिक घडवतात. अशावे...

तुझे लाजणे || प्रेम कविता || Love Marathi Poem ||

किती आठवांचा उगा अट्टाहास नव्याने तुला ते जणू पाहताच!!  सोबतीस यावी ही एकच मागणी तुझ्यासवे त्या जणू बोलतात !! चांदणी ती पाहता तुला शोधणे रात्रीस त्या जणू हरवणे !! चांदणे होऊन तू पसरून जावे  त्या चंद्रास त्या जणू सांगतात !! जशी छेडली ती तार क्षणांची !! सूर जणू भेटले त्या सुरांशी !! गीत होऊन ऐकत रहावे  ही एकच मागणी जणू मागतात!! शब्दही ही का प्रेम करत रहावे !! तुझ्याचसाठी जणू ते सुचावे !! अलगद त्या कागदावर लिहिताना कविता होऊन जणू बरसतात !! सांगशील का तूच आज हे काही ?? आठवांचा हट्ट जणू जातं नाही !! तेव्हा पाहून लाजणे तुझे असे की प्रेमात जणू तूझ्या पाडतात !! ✍️ योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*