मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनोळखी एक पाहुणा || Marathi Poem ||

अचानक यावा पाहुणा तो अनोळखी!! जीवन मरणाची त्याच्याकडून भीती !! तूच घ्यायची आहेस स्वतःची काळजी!! घरात राहशील तर, ना तुला त्याची भीती !! समजून घे , आहे फार तो जिद्दी !! तुझ्या एका चुकीची ,शिक्षा होईल फार मोठी !! हलगर्जी नसावी , एवढी एकच मागणी !! नकोस विसरू ,तुझी स्वप्ने आहेत मोठी !! सारे थांबले आहे , नकोस होऊ दुःखी!! देव रुपी वैद्य , आहे खूप जिद्दी !! पराभूत केले त्यास, पाहा त्याने किती !! संपूर्ण त्याचा अंत, करेन हा जिद्दी !! अहोरात्र आपल्या सुरक्षेची काळजी !! तहान भूक विसरून , त्यांनी करावी ती किती !! वर्दतील त्या पोलिसांची ही कहाणी !! आपल्या सहकार्याने , सोपी होईल ती किती ?? जणू युद्ध पुकरावे , सारा देश आहे सोबती!! अनोळखी या पाहुण्यास, वाट दाखवू बाहेरची !! प्रशासनास सहकार्य, हीच खरी शक्ती !! मग पाहा , लवकरच या पाहून्यास , वाट दाखवू बाहेरची !! ✍️योगेश